नेरळ : प्रख्यात लेखक आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या ‘तो मी नव्हेच’ या अजरामर नाटकातील मुख्य पात्र असलेल्या ‘लखोबा लोखंडे’च्या भूमिका सत्यात उतरली असल्याचे समोर आली आहे. रत्नागिरीमधील एका माणसाने दोघींशी लग्न, तिसरीसोबत लग्नाची सुपारी फोडून चौथीसमवेत लग्नाची बोलणी करणाऱ्या आरोपीला नेरळ पोलिसांनी अटक केली आहे. विशेषत: यामध्ये एक महिला पोलिस कॉन्स्टेबलचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Weather Update : हुडहुडी वाढली! राज्यात तापमानाचा पारा घसरला
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांचे लग्न जुळत नाही किंवा ज्यांचे वय आधिक झाले आहे अशा महिलांसोबत ओळख निर्माण करून आरोपी योगेश यशवंत हुमने (३३) हा महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचे काम करत होता. आरोपी योगेशने आतापर्यंत अनेक मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आरोपी विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी कडक तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
प्रकरण कसे आले समोर?
कोल्ह्यारे जवळील राहणारी ३४ वर्षीय पीडित विवाहित महिलेने आपल्याच पती विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत महिलेने पतिविरोधत मानसिक छळवणूक आणि आर्थिक फसवणूक तसेच पतीचे या आधी लग्र झाले असताना, माझी फसवणूक करून माझ्यासोबत दुसरे लग्न केल्याचे तक्रारीत म्हटले होते. यामधे १५ ते २० लाखाची आर्थिक फसवणूक केल्याचे पीडित महिलने सांगितले होते. याबाबत तक्रारदार महिलेच्या सांगण्यावरून पती योगेश यशवंत हुमने या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला.