‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक सोमवारी लोकसभेत

नवी दिल्ली : भारत देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात, निवडणूक प्रक्रिया अधिक प्रभावी, किफायतशीर आणि वेळेची बचत करण्यासाठी ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक प्रस्तावित करण्यात आले आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल सोमवारी १६ डिसेंबर रोजी हे विधेयक लोकसभेत मांडणार आहेत.

लोकसभेत हे विधेयक मांडल्यानंतर सविस्तर चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवले जाईल. ‘एक देश, एक निवडणूक’ यासाठी 2 सुधारणा विधेयके आणली जातील. यापैकी एक विधेयक लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्यासाठी तर दुसरे विधेयक दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि पाँडीचेरी विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी असेल.

केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच या विधेयकाला मंजुरी दिली असून २०३४ नंतर देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी राज्यघटनेत बदल केले जातील, ज्यामध्ये कलम ८३, १७२ आणि ३२७ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय केंद्रशासित प्रदेश आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना कायद्यातही बदल करण्यात येणार आहेत.

‘एक देश, एक निवडणूक’ या प्रस्तावावर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाष्य करत भाजपला लक्ष्य केले. हा प्रस्ताव म्हणजे भाजपचा ‘निवडणूक जिंकण्याचा जुगाड’ आहे. खराब वातावरणाच्या परिस्थितीमुळे किंवा सणासुदीमुळे निवडणुका पुढे ढकलणारे सरकार एकाच वेळी निवडणुका कशा घेऊ शकते, असा प्रश्नही यादव उपस्थित केला.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे