नोकरीवरून कमी केल्याच्या रागातून तरूणाचा अधिकाऱ्यावर हल्ला

सोलापूर : नोकरीवरून कमी केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने माळशिरस तालुका पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


माळशिरस तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आबासाहेब हरी पवार (वय ५२, मूळ रा. ढोलेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अमोल बाबासाहेब पाटील असे आरोपीचे नाव आहे. माळशिरस तालुका पंचायत समिती कार्यालयात अमोल पाटील हा नोकरीवर होता. परंतु कर्तव्य कचराईमुळे आणि असमाधानकारक कामामुळे त्याची चौकशी होऊन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्यास नोकरीवरून कमी करण्यात आले होते.


त्यामुळे तो अस्वस्थ होता. त्यातूनच रागापोटी त्याने गट विकास अधिकारी आबासाहेब पवार यांच्या शासकीय बंगल्यात घुसून त्यांच्यावर काठीने हल्ला केला. त्यांच्या खिशातील पाच हजारांची रोकडही त्याने बळजबरीने काढून घेतली. तुमच्यामुळे माझी नोकरी गेली, तुम्ही पुन्हा मला कामावर घेतले नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, माळशिरसमध्ये तुम्ही नोकरी कशी करतात तेच बघतो, अशी धमकीही त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Comments
Add Comment

Marathwada Earthquake : 'मध्यरात्री धरणी हादरली!' औंढा नागनाथात ३.६ रिश्टरचा भूकंप; भीषण गडगडाटाने नागरिकांची झोप उडाली

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यासह परिसरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये

महिला शेतकऱ्यांच्या श्रमाला कायद्याचे कवच

विधानसभेत विशेष विधेयक; जमिनीची प्रत्यक्ष मालकी नसली तरी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा मुंबई (सुहास

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सियाचा व्हिडिओ व्हायरल

सिया-चेतनच्या कथित नात्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; तपासाला नवे वळण? पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या

Vidhan Sabha : महत्त्वाच्या चर्चेवेळी अधिकाऱ्यांची दांडी, नगरविकास सचिवांना विधानसभा अध्यक्षांची नोटीस

मुंबई : मुंबईशी (Mumbai) संबंधित अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर विधानसभेत चर्चा सुरू असताना, अधिकारी

Maharashtra Rain Alert : हवामान विभागाचा इशारा: राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढचे १०० तास महत्त्वाचे

पुढील आठवड्यात महाराष्ट्रात दमदार पाऊस  मुंबई : पुणे वेधशाळेने ५ ते ७ जुलैदरम्यान महाराष्ट्रभर समाधानकारक ते

Nitesh Rane : मुंद्रा पोर्टच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार – नितेश राणे

आधुनिक बंदर व्यवस्थापनाचा महाराष्ट्राला लाभ; करण अदानींसोबत नितेश राणेंची चर्चा News: मुंबई : महाराष्ट्राचे