Beed News : धक्कादायक! परीक्षा देतानाच विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

बीड : बीड जिल्ह्यात (Beed News) एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. पेपर लिहत एका विद्यार्थ्याचा जीव गेला असल्याची घटना घडली आहे. बीडमधील के. एस. के. महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देत असतानाच विद्यार्थ्याला हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये परीक्षा देत असताना एका २४ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिद्धार्थ मासाळ असे विद्यार्थ्याचे नाव असून तो पदवीच्या पहिल्या वर्षाची परीक्षा देत होता. के एस के महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.


या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांमध्ये गाठी तयार झाल्याने त्याला हृदयविकाराचा धक्का आल्याचे शवविच्छेदनातून समोर आले आहे. (Beed News)

Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन