Tuesday, January 14, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेUlhasnagar : 'उल्हासनगरची वाढणार सांस्कृतिक ओळख'

Ulhasnagar : ‘उल्हासनगरची वाढणार सांस्कृतिक ओळख’

मराठी संस्कृती भवनासाठी सरकारचा निधी मंजूर

उल्हासनगर : उल्हासनगरातील कॅम्प एक परिसरात बाल शिवाजी उद्यान, कॅम्प तीनमध्ये बोट क्लब सुशोभीकरण, कॅम्प पाचमध्ये महिला भवन तसेच मराठी संस्कृती भवन उभारले जाणार आहे. त्यासाठी १५ कोटी ५० लाखांच्या निधीची गरज आहे. यात सरकारचा हिस्सा देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकल्पांचे काम लवकरच सुरू होणार आहे.

Road Side Dogs : केडीएमसी क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा वाढला उच्छाद

उल्हासनगर महापालिका क्षेत्रात शहरात भव्य क्रीडा संकूल, सांडपाणी योजना, पाणी योजना, ई-चार्जीग स्टेशन, परिवहन सेवा कार्यरत आहेत. यात आता तीन प्रकल्पांची भर पडणार आहे. उल्हासनगरच्या कॅम्प एक भागात बाल शिवाजी उद्यान, तसेच कॅम्प पाच भागात महिला आणि मराठी भवन उभारले जाणार आहे. कॅम्प एक भागातील उद्यानासाठी ५० लाखांचा आराखडा तयार केला होता. त्यानुसार महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी नगरोत्थान महाअभियानांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून या प्रकल्पासह इतर चार प्रकल्पांसाठी सरकारने आपला हिस्सा देण्यास मंजुरी दिली आहे. राज्य सरकारकडून या प्रकल्पांसाठी ७० टक्के तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची ३० टक्के भागीदारीतून हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत. या चारही प्रकल्पांसाठी १० कोटी ८५ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. एकूण १५ कोटी ५० लाख रुपयांच्या

खर्चातून हे प्रकल्प साकारले जाणार आहेत. यातील बाल शिवाजी उद्यानासाठी महापालिकेचा हिस्सा १५ लाखांचा आहे.
तसेच सरकारकडून यासाठी ३५ लाख रुपये मिळणार आहेत. कॅम्प तीन येथील बोट क्लबचे सुशोभिकरणही केले जाणार आहे. यातील एकूण ५ कोटी रुपये खर्च असलेल्या प्रकल्पात तीन कोटी ५ लाख रुपये सरकाकडून उपलब्ध केले जाणार आहेत. कॅम्प पाच भागातही महिला भवन उभारले जाणार आहे. त्यासाठी सरकारचे तीन कोटी ५ लाख रुपये आहेत. उल्हासनगरात मराठी संस्कृती भवनही उभारले जाणार आहे, या कामालाही आता गती मिळालेली आहे. त्यासाठी ५ कोटी रुपयांच्या खर्चातून मराठी संस्कृती भवन साकारले जाणार आहे. यात सरकारकडून ३ कोटी ५ लाख रुपयांच्या हिस्सा मंजूर करण्यात आला आहे. उल्हासनगरातील या सर्वच प्रकल्पांसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -