Raigad Fort : शिवभक्तांच्या मागणीची पूर्तता होणार

किल्ले रायगडावरील वाघ दरवाजाच्या जतन, संवर्धन कार्यास सुरुवात


महाड: मराठा कालखंडातील लष्करी वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या वाघ दरवाजाचे जतन व संवर्धन कार्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती रायगड प्राधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली असून गेल्या अनेक वर्षांपासून शिवभक्तांच्या असलेल्या या मागणीची पूर्तता होणार असल्याने शिवभक्तांकडून आनंद व्यक्त होत आहे. या संदर्भात रायगड प्राधिकरणचे तज्ञ वरूण भामरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार रायगड प्राधिकरण करून आजपर्यंत गडावरील व गडा परिसरातील गावांच्या करण्यात आलेल्या संवर्धनाच्या कामानंतर आता चालू वर्षात महत्त्वपूर्ण कामे हाती घेण्यात आली असून त्यापैकी एक वाघ दरवाजाचे संवर्धन हे आहे असे स्पष्ट केले. यानंतर महादरवाजा नजीक हिरकणी बुरुज व परिसरातील बांधकामांचे जतन व संवर्धन करण्याच्या कामी बांधकाम विभागाकडून निधी मंजूर झाला असून प्राधान्याने भाग दरवाजाचे काम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



तसेच स्वराज्याचे तिसरे छत्रपती शिवपुत्र राजाराम महाराज रायगडावरील ज्या दरवाजातून निसटले, तो दरवाजा म्हणजे वाघ दरवाजा असल्याचे स्पष्ट करून या दरवाजाकडे जाणाऱ्या मार्गाची दुरुस्ती आवश्यक आहे. वाघ दरवाजा आजही चांगल्या स्थितीत असून त्याचे जतन आणि संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मान्यतेने रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने सुरू करण्यात आल्याचे नमूद केले. वाघ दरवाजा आणि त्याच्याशी जोडलेल्या तटबंदीचे दस्तऐवजीकरण केल्यानंतर जतन व संवर्धनाचे काम तीन टप्प्यांत सुरू करण्यात आले आहे.


मराठा साम्राज्याच्या अतिशय बिकट प्रसंगी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वाघ दरवाजाचे जतन व संवर्धन प्रगतीपथावर असल्याचे पाहून मनस्वी आनंद व समाधान वाटते अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वाघ दरवाजाविषयी इतिहासात आढळून आलेल्या त्या संदर्भातील घटनांमुळे शिवभक्तांमध्ये त्याबद्दलची असलेली उत्सुकता व कुतूहल लक्षात घेऊन कामे गतीने व योग्य पद्धतीने पूर्ण व्हावी याचे प्रयत्न युद्धपातळीवर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात झाली. याअंतर्गत एअर इंडिया

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण

Kokan Railway : प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद; 16 जुलैपासून इंटरसिटी, डेक्कन क्वीन पुन्हा रुळावर

रायगड : मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त गाड्या

Mumbai-Goa Express Highway : कशेडी घाटात दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद, एकाच लेनवरून दुहेरी वाहतूक

पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Goa National Highway) प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून अबू धाबीसाठी आठवड्यातून तीन दिवस थेट विमान सेवा

नवी मुंबई विमानतळ : अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) संचलित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NHIA)