Cement Price Hike : घर बांधणीचा खर्च वाढणार! सिमेंटच्या दरात झाली 'इतकी' वाढ

  107

मुंबई : देशभरात सातत्याने महागाई (Inflation) वाढत चाललल्याचे चित्र दिसून येत आहे. खाद्य तेल, डाळी, भाजीपाला, फळे, साबण, पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदी अशा गरजेपयोगी वस्तूंसह प्रवासही महागला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची मोठी झळ बसत आहे. आता ही महागाई घर बांधकामावरही येत आहे.


काही महिन्यांपूर्वी सळईच्या दरात प्रति टन १५०० ते २००० रुपये वाढ झाली होती. त्यानंतर आता बांधकाम व्यवसायातील प्रमुख साधन सामग्री असलेल्या सिमेंटच्या दरातही वाढ झाल्याचे (Cement Price Hike) पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना घर खरेदी करणे किंवा घर बांधणे यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे.



पाच महिने सिमेंटच्या किंमती स्थिर राहिल्यानंतर आता सिमेंटच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पावसाळी मोसमानंतर बांधकाम क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. तसेच मोठ्या पायाभूत प्रकल्पांमध्येही सिमेंटची मागणी कायम असल्याने या महिन्यात सिमेंटच्या किमतीत वाढ झाली.



काय आहेत सिमेंटचे दर?



  • पश्चिम भारतात ५० किलो सिमेंटच्या पोत्याच्या किमतींमध्ये ५ ते १० रुपयांची वाढ झाली असून, सध्याच्या किमती ३५० ते ४०० रुपयांदरम्यान आहेत.

  • उत्तर भारतात दिल्लीसह अनेक भागांमध्ये पोत्यामागे २० रुपयांनी वाढ झाली असून किमती ३४० ते ३९५ रुपयांदरम्यान आहेत.

  • दक्षिण भारतातही पोत्यामागे ४० रुपयांपर्यंत किंमत वाढली आहे. त्यानुसार दक्षिण भारतात प्रति सिमेंट पोत्याचे दर ३२० रुपयांवर पोहोचले आहेत.

  • पूर्व भारतातही सिमेंट बॅगची किंमत ३० रुपयांनी वाढली आहे.


दरम्यान, इनक्रेड इक्विटीजच्या अहवालातील अंदाजानुसार, २०२५च्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारचा भांडवली खर्च अजून वाढणार आहे, त्यामुळे सिमेंटच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पण वाढीव उत्पादन क्षमतेमुळे मोठ्या प्रमाणावर दरवाढ नको, अशी मागणी आताच उद्योगातून सुरू झाली आहे. (Cement Price Hike)

Comments
Add Comment

Amit Shah: अमित शहांनी लालकृष्ण अडवाणींचा विक्रम मोडला! भूषविले सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावे एक विक्रम प्रस्थापित झाला आहे. सर्वाधिक काळ देशाचे

DRDO गेस्ट हाऊसच्या मॅनेजरला हेरगिरी प्रकरणात अटक

नवी दिल्ली: ज्योती मल्होत्रानंतर भारतातील गुप्तचर यंत्रणानी आणखी एका हेराला अटक केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर

Uttarkashi Cloud burst: उत्तरकाशीच्या धारलीमध्ये ढगफुटी, डोंगरावरून वाहत आले हजारो टन पाणी, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्यात गाडले, पहा VIDEO

उत्तरकाशी: उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार पसरला आहे. येथील धारली गावात आलेल्या

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात

PM Modi : एनडीएच्या बैठकीत मोदींचा सत्कार; 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'महादेव'च्या यशावर अभिनंदनाचा वर्षाव! पाहा VIDEO

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्ली येथे झालेल्या एनडीए संसदीय

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे