शेल्टर डोमचे भूमिपूजन संपन्न

२० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४


नाशिक : क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे येत्या २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे शेल्टर - २०२४ हे गृहप्रदर्शन आयोजित होत असून प्रदर्शन स्थळी डोम उभारणीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. प्रदर्शनात अगदी १० लाखापासून ५ कोटीपर्यंत घरे, दुकाने, प्लॉट, फार्म हाऊस, ऑफिस, गोडाऊन, शेत जमीन, औद्योगिक प्लॉट यांचे असंख्य पर्याय तसेच इंटेरियर,बांधकाम साहित्य , नाविन्य पूर्ण तंत्रज्ञान ,सुरक्षा साहित्य ,गृह कर्ज असे अनेक स्टॉल एकच छताखाली उपलब्ध असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली. महाराष्ट्रातील सर्वात मोठे गृहप्रदर्शन असलेल्या शेल्टरकडे शहराचा उत्सव म्हणून बघितले जात असल्याचे नमूद करून कृणाल पाटील म्हणाले की, कृषी,आरोग्य ,शिक्षण ,उद्योग, ,कृषीपूरक व्यवसाय ,निर्यात तसेच इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात वाढत असलेल्या नाशिकमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. अश्या बहुआयामी नाशिकमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात अवश्य गुंतवणूक करावी. शेल्टर - २०२४ चे समन्वयक गौरव ठक्कर म्हणाले की, या प्रदर्शनाचे औचित्य साधून क्रेडाई जगभरात नाशिकचे ब्रॅन्डींग करत असते. यामध्ये नाशिकमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध संधींची माहिती अनेकांना दिली जाते.
प्रसंगी उपस्थित शेल्टर - २०२४चे मार्गदर्शक दीपक बागड म्हणाले प्रदर्शना दरम्यान विविध विषयांवरील मार्गदर्शक सेमिनार चे देखील आयोजन करण्यात आले असून रोज संध्यकाळी करमणुकीचे कार्यक्रम देखील प्रदर्शन स्थळी असतील.
क्रेडाई नाशिक मेट्रो चे सदस्य म्हणजे विश्वसनीयता असे समीकरण गेल्या अनेक वर्षात प्रस्थापित झाले असल्याचे देखील त्यांनी नमूद केले .



तिसरी पिढी बांधकाम व्यवसायात : पारंपारिक बांधकाम ते आजचे बांधकाम यामध्ये तंत्रज्ञान ,ग्राहकांच्या आवडीनिवडी,गरजा यात आमूलाग्र बदल झाला आहे.कधीकाळी टुमदार बंगल्यांचे शहर असलेले नाशिक आज उंच इमारतींचे तसेच टाऊनशिपचे शहर म्हणून ओळखले जात आहे. शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांची तिसरी पिढी, अनेक नव उद्योजक या क्षेत्रातील उच्च शिक्षण घेऊन तसेच नाशिक बाहेरील अनेक अग्रणी बांधकाम व्यवसायिक नाशिककरांच्या सेवेत कार्यरत आहे. क्रेडाई नाशिक मेट्रो आणि शेल्टर नावारूपाला येण्यासाठी जितुभाई ठक्कर,अनंत राजेगावकर , सुरेश अण्णा पाटील, किरण चव्हाण, नेमीचंद पोतदार,सुनील कोतवाल,उमेश वानखेडे,रवी महाजन या सर्व माजी अध्यक्षांची मोलाची भूमिका असून त्यांचे नियमित मार्गदर्शन लाभत आहे. भूमिपूजनाचे स्वागत व आभार सहसचिव नरेंद्र कुलकर्णी यांनी मानले.


प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सुजॉय गुप्ता, जयंत भातांब्रेकर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, ऋशिकेश कोते, मनोज खिंवसरा तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, शामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर, युथ विंगचे सह समन्वयक सुशांत गांगुर्डे, वृषाली महाजन,सोनाली बागड हे विशेष सहकार्य करत आहेत.


शेल्टर मधील खास आकर्षणे
- १०० हून अधिक विकसकांचे ५०० हून अधिक पर्याय
- दररोज दर 3 तासांनी लकी ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षिसे. आणि बम्पर बक्षीस –टी.व्ही.एस दुचाकी
-सहभागी विकसकांकडून विविध आकर्षक योजना जसे नोंदणी शुल्क माफ ,नो जीएसटी व अन्य
-लहान मुलांसाठी फ्रावशी शाळेतर्फे विशेष प्ले एरिया
-भविष्यातील नाशिक या विषयावर तज्ञांनी रेखाटलेले प्रदर्शन
-मोफत पार्किंगची सुविधा. तसेच मोफत व्हॅले पार्किंग उपलब्ध
- आंतरराष्ट्रीय स्तराचा प्रदर्शनाचा लेआउट
- सुसज्ज फूड कोर्ट

Comments
Add Comment

नाशिक जिल्ह्यातील ११ नगर परिषदांसाठी आज होणार मतदान

नगरसेवक पदासाठी १०२८, तर नगराध्यक्षपदासाठी ६१ उमेदवार आखाड्यात नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील ११

कुंभमेळा आरक्षित क्षेत्राचे संपादन न करता कारवाई रद्द करावी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिका विकास आराखड्यानुसार साधूग्राम व संलग्न सुविधांसाठी एकूण सुमारे ३७७ एकर

Nashik Crime News : भिंतीवर 'बिब्बा' आणि 'नागाच्या आकाराचा खिळा'! ७ पानी सुसाईड नोट लिहून संपवलं होतं नेहाने जीवन, नेहाच्या घरात बरंच काही मिळालं...

नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरातील हिरावाडीत राहणाऱ्या नेहा संतोष पवार या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात एक

Nashik Crime : ७ पानी सुसाइड नोट! अवघ्या ५ महिन्यांपूर्वी गृहप्रवेश झाला, अन् सासरच्या छळाला कंटाळून नववधूची आत्महत्त्या!

नाशिक : नाशिक शहरातील हिरावाडी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पतीसह सासरच्या

इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित अपघातात गंभीर जखमी

इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी आली आहे. इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित अपघातात गंभीर जखमी

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या ६६ किमी परिक्रमा मार्गाला ‘हिरवा कंदील’

भूसंपादनासह रस्त्याच्या उभारणीकरिता सात हजार ९२२.११ कोटी रुपयांचा निधी मंजूर नाशिक (प्रतिनिधी): आगामी सिंहस्थ