नवी दिल्ली: दिल्लीच्या अनेक शाळांमध्ये शुक्रवारच्या सकाळी एक धमकीवजा फोन आला. कॉलची माहिती दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. यानंतर लगेचच तपास सुरू करण्यात आला. तपासात अद्याप पर्यंत काही संशयास्पद आढळलेले नाही. ज्या शाळांना बॉम्बची धमकी मिळाली आहे त्यात ईस्ट ऑफ कैलाश डीपीएस, सलवान स्कूल, मॉडर्न स्कूल आणि केंब्रिज स्कूलचा समावेश आहे.
याआधी ८ डिसेंबरला आला होता मेल
याआधी दिल्लीच्या ४० हून अधिक शाळांना ८ डिसेंबरला रात्री ११.३८च्या सुमारास याच पद्धतीचा धमकीवजा ईमेल आला होता. यात दावा करण्यात आला होता की त्यांनी कॅम्पसमध्ये बॉम्ब लावले आहेत. मेलमध्ये म्हटले होते की बॉम्ब फुटले तर मोठे नुकसान होईल. मेल पाठवणाऱ्या स्फोट रोखण्यासाठी ३० हजार डॉलरची मागणी केली होती.
शाळा व्यवस्थापनाने तातडीने कारवाई करताना मुलांना परत पाठवले होते. तसेच फायर ब्रिगेड आणि पोलिसांना सूचना दिली होती. तपासानंतर हा मेल फेक असल्याचे समजले होते.