Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजविधिमंडळ विशेष

Winter session of Parliament : संसदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

Winter session of Parliament : संसदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानच्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज उद्या, बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आलेय. विरोधकांना विविध विषयांवरून गदारोळ केल्यामुळे हे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.


​​​​​​​संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, कोणतेही मुद्दे असले तरी आम्ही सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणणार नाही. सपा, टीएमसी आणि काँग्रेससह विविध पक्षांचे अनेक खासदार माझ्याकडे आले. रिजिजू यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण काँग्रेस पक्षाला राज्यसभेत चर्चा करायची आहे, फक्त राहुल गांधींना संसदेच्या कामकाजात भाग घ्यायचा नाही. कदाचित त्यांचा संसदीय लोकशाहीवर विश्वास नाही. सर्व खासदारांना चर्चा हवी असते, प्रत्येक खासदारासाठी त्याचा संसदीय मतदारसंघ महत्त्वाचा असतो.





राहुल यांच्यासाठी कोणताही मुद्दा महत्त्वाचा नाही असे रिजीजू यांनी सांगितले. तर काँग्रेस खासदार प्रियंका वाड्रा म्हणाल्या की, आम्ही जनतेसाठी विरोध करीत आहोत परंतु, सरकारलाच चर्चा नकोय. दररोज कोणत्या ना कोणत्या निमित्ताने सभागृहाचे कामकाज तहकूब केले जात आहे.

Comments
Add Comment