PMP Bus : ‘पीएमपी’च्या ताफ्यात लवकरच येणार ४०० बस

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपी) आणि केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेच्या (सीआयआरटी) अधिकाऱ्यांनी ‘सीएनजी’वर धावणाऱ्या बसच्या प्रतिकृतीची (प्रोटोटाइप) पाहणी केली असून, त्याच्या उत्पादनाला मंजुरी दिली आहे. लवकरच बसच्या उत्पादनाला सुरुवात होईल.

फेब्रुवारीमध्ये ४०० नवीन सीएनजी बस ‘पीएमपी’च्या ताफ्यात दाखल होतील. त्यामुळे प्रवास सुरळीत होण्यास मदत होणार आहे. यातून दररोज सुमारे तीन लाख प्रवाशांची वाहतूक होईल.‘पीएमपी’मध्ये गेल्या काही दिवसांपासून नवीन बसचा प्रश्‍न रेंगाळला होता. संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळूनही बसखरेदीला उशीर झाला. त्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण सांगण्यात आले. आता नवीन बस खरेदीला गती प्राप्त झाली आहे.

नुकतेच ‘सीआयआरटी’ व ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांनी एकत्रित नवीन बसच्या प्रोटोटाइपची पाहणी केली. त्याबद्दल दोन्ही संस्था सकारात्मक असून, लवकरच उत्पादनास सुरुवात होणार आहे. फेब्रुवारीमध्ये ४०० बस ‘पीएमपी’च्या ताफ्यात दाखल होतील, असे नियोजन केले आहे.


दररोज ४५ बस ब्रेकडाउन!


‘पीएमपी’च्या ताफ्यात २ हजार १०० बस असल्या, तरीही प्रत्यक्षात १ हजार ६५० बस धावतात. त्यापैकी सुमारे ४५ बस दररोज ब्रेकडाउन होतात. शिवाय आयुर्मान संपलेल्या बसची संख्याही जास्त आहे. त्यामुळे प्रवासी सेवेवर मोठा परिणाम होत आहे. यात नवीन बसची खरेदी होणे खूप आवश्यक होते. नव्या बसमुळे प्रवासी सेवा सुधारेल. सध्या बसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना फटका बसत आहे.

पहिल्या टप्प्यात भाडेतत्त्वावरील ४०० बस दाखल होतील. दुसऱ्या टप्प्यात स्वमालकीच्या २०० बस दाखल होणार आहेत. दोन्ही बस ‘सीएनजी’वर धावतील. बसची संख्या वाढल्याने पीएमपीची प्रवासी सेवा अधिक चांगली होण्यास मदत मिळेल

 

 
Comments
Add Comment

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Ahilyanagar Crime News : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, मुकादमाच्या मुलावर गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील एका गावातील

Pune News : पुणे स्थानकातून प्रवाशांची अजब हातसफाई : ५ वर्षांत ३ कोटींचे बेडशीट अन् टॉवेल लंपास; रेल्वेने ठेकेदाराकडून वसूल केली भरपाई!

पुणे : रेल्वेच्या वातानुकूलित (AC) डब्यातून प्रवास करताना प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे

Pratap Sarnaik : गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :  श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईसाठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा 'मास्टर प्लॅन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये 'मॅपलट्री'कडून १.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित मुंबई :

Nandurbar : नंदुरबार हादरलं ! अल्पवयीन मुलांसह तरुणांचे लैंगिक शोषण, दोनशेपेक्षा अधिक आक्षेपार्ह चित्रफिती

Nandurbar : नंदुरबारमध्ये एक हादरवणारा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालकांसह काही तरुणांचे लैंगिक