मुंबई : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. त्यानंतर आता विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणार आहे. या संदर्भातील तारीख जाहीर करण्यात ...
संजय मल्होत्रा नेमके कोण आहेत?
संजय मल्होत्रा हे १९९० बॅचचे राजस्थान केडरचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. मल्होत्रा यांनी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी, यूएसए येथून पब्लिक पॉलिसी या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांंनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणी इत्यादींसह विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयात सचिव (महसूल) पदावर कार्यरत आहेत. त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले होते. मल्होत्रा यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या संदर्भात कर धोरण तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.