Weekly Horoscope : साप्ताहिक भविष्य, ८ ते १४ डिसेंबर २०२४

Share

साप्ताहिक राशिभविष्य, १ ते ७ डिसेंबर २०२४

उत्साहात भर पडेल

मेष : कलाकार तसेच साहित्य क्षेत्रातील जातकांना प्रसिद्धीसह धनलाभाचे योग. नवीन कामे मिळतील. पूर्वी केलेल्या कामाचे फळ मिळू शकते. आपला बराचसा वेळ या सप्ताहात घरगुती कामात जाण्याची शक्यता आहे. घरातील समस्या सोडविण्याची जबाबदारी घेतल्यामुळे आपल्याला समाधान मिळेल. नोकरदारांना दिलासा मिळण्याची शक्यता. सरकारी नोकरीत कामाचे स्वरूप बदलू शकते. अतिरिक्त कार्यभार सोपविला जाण्याची शक्यता. बदलीसाठी तयार राहा. मात्र पदोन्नती व वेतन वृद्धी होऊ शकते. त्यामुळे आपल्या उत्साहात भर पडेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील..

नियोजन सफल होईल

वृषभ : अनुकूल ग्रहमानाची साथ मिळाल्यामुळे पूर्वी केलेले नियोजन आत्ता पूर्ण आकारबद्ध रीतीने होताना दिसेल. नियोजित कामे पार पाडू शकाल. नोकरीत अनुकूल परिस्थितीचा अनुभव घ्याल. वरिष्ठांची मर्जी टिकवण्यात यश मिळेल. आपली मते इतरांना पटवून देता येतील. राहत्या घराबाबतचे प्रश्न सुटतील. व्यवसायात आपण व्यावसायिक विस्तार करू शकता. संगणक, क्रीडा क्षेत्रातील जातकांना उत्तम काळ राहील. घरामध्ये एखादा छोटासा कार्यक्रम होईल. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होऊ शकतात. नातेवाईक, मित्रमंडळी भेटतील. आर्थिक बाजू भक्कम राहिल्यामुळे समाधानी व उत्साही राहाल. आरोग्य उत्तम राहील.

परिश्रमाचे चीज होईल

मिथुन : हा आठवडा तसा अनुकूल स्वरूपाचा जाणार आहे. घेतलेल्या परिश्रमाचे चीज होईल. नोकरदारांना दिलासा मिळू शकतो. पदोन्नती व वेतन वृद्धीची शक्यता. नोकरीनिमित्त प्रवासाचे योग. जवळचे किंवा दूरचे प्रवास करण्याचे नियोजन करू शकाल; परंतु वादविवादाचे प्रसंग टाळा. कुटुंबातील मुला-मुलींकडून मनाला समाधान देणाऱ्या वार्ता मिळतील. त्यांच्याविषयी असलेल्या समस्या संपुष्टात आल्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी व समाधान अनुभवाल. व्यवसायात उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढल्यामुळे समाधानी राहाल. व्यावसायिक भागीदारबरोबर उत्तम
संबंध राहतील.

नवीन संधीचा फायदा

कर्क : अनुकूल ग्रहमानामुळे सकारात्मकता वाढेल. आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्या. मनासारख्या गोष्टी साध्य करता येतील. नोकरदारांना नोकरीत दिलासा मिळेल. व्यवसायात नवीन नियोजन करावे लागेल. बदलत्या परिस्थितीचा फायदा घेता येईल. नवीन योजना व नवीन तंत्रज्ञान उपयोगाला येऊ शकते. जुगारसदृश व्यवहार, शेअर बाजार यापासून तूर्त दूर राहणे हितकारक ठरेल. व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल कालावधी लाभेल. नवीन संधीचा फायदा घ्या. नवीन करार-मदार होतील. व्यावसायिक प्रवास घडून प्रवास कार्य सिद्ध होतील. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा होईल.

मानसन्मान वाढेल

सिंह : एखाद्या महत्त्वाच्या कामाबद्दलचा पाठपुरावा यशस्वी होऊन तसेच घेतलेले कष्ट फलद्रूप होऊन त्याचे परिणाम अनुभवता येतील. आनंद आणि उत्साहात भर पडेल. पुढील नियोजन करता येईल. नोकरदारांना नोकरीत दिलासा मिळू शकतो. वरिष्ठांची मर्जी राहील. तसेच सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कलाकार, खेळाडू व साहित्य क्षेत्रातील मंडळींना प्रोत्साहन मिळेल. मानसन्मान वाढेल. समाधानकारक अर्थप्राप्ती होईल. मात्र स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण अति आवश्यक आहे. अहंकार आणि उद्धटपणा टाळा.

सावधगिरी बाळगा

कन्या : या आठवड्यात आयपेक्षा व्यय होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे सुरुवातीपासूनच अनावश्यक खर्च टाळणे हितकारक ठरेल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या असल्यामुळे विचारात पडाल. नोकरदारांना वरिष्ठांशी मिळते-जुळते घ्यावे लागेल. मात्र अपेक्षित गोष्टी साध्य होतील. वाहन चालविताना वाहनांच्या वेगावर नियंत्रण अति आवश्यक आहे. प्रवासात सावधगिरी बाळगा. वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक ठरेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

प्रयत्न यशस्वी होतील

तूळ : थोड्याच प्रयत्नांनी आपली रोजची कामे लवकर होत असल्याचे अनुभवून आपण आश्चर्यचकित व्हाल. सर्व दृष्टीने हा आठवडा यशदायी स्वरूपाचा राहणारा आहे. बहुतेक सर्व कार्यात यश मिळेल; परंतु खर्च वाढणार आहे. अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल. तसेच घाईगर्दीत निर्णय घेऊ नका. प्रवासाचे योग आहेतच; परंतु प्रवासात सावधानता बाळगणे इष्ट ठरेल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण अति आवश्यक राहील. प्रवास कार्य सिद्ध होतील. स्थावर बाबतचे प्रश्न मिटतील. व्यावसायिक नवीन विस्तार करण्याचे मनात येईल. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न यशस्वी होतील.

आर्थिक प्रश्न सुटेल

वृश्चिक : व्यवसाय, नोकरी-धंदा आपल्या कार्यक्षेत्रात सर्व बाबतीत हा आठवडा फायदेशीर स्वरूपाचा ठरणारा आहे. नोकरदारांना नोकरीत मोठा दिलासा मिळू शकतो. बदलीसाठी प्रयत्न केल्यास यशस्वी होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. स्थावर बाबतचे प्रश्न सुटू लागतील; परंतु स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण अति आवश्यक राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरी व्यवसायात आपल्या शब्दाला प्राधान्य मिळेल. कृषी व सरकारी स्वरूपाची कामे करणाऱ्यांना हा काळ उत्तम राहील. आर्थिक प्रश्न सुटेल. धावपळ टाळा, पथ्य पाळा.

आव्हाने स्वीकारा…

धनु : प्रदीर्घबदलत्या परिस्थितीनुसार आपल्या कार्यक्षेत्र अथवा कुटुंबात निरनिराळी आव्हाने स्वीकारणे क्रमप्राप्त ठरेल; परंतु ही आव्हाने आपल्यासाठी एक संधी म्हणून येतील हे लक्षात ठेवा. आव्हाने स्वीकारा. त्यामुळेच प्रगती होईल. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घ्यावे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ उत्तम राहील. आपल्या कार्याची दखल घेतली जाईल. लोकप्रियतेमध्ये वृद्धी होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. व्यवसायात आर्थिक मदतीची गरज भासू शकते.

फायद्याचे सौदे

मकर : विविध क्षेत्रांत प्रगती करण्याची संधी मिळेल. व्यापार, व्यवसाय, धंद्यात नवीन करारमदार होऊन काही फायद्याचे सौदे हाती येण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ उत्तम राहील. मात्र हितशत्रू डोके वर काढण्याची शक्यता आहे. त्यांच्या कारवायांवर लक्ष असू द्या. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. शेअर बाजार, वायदे बाजार जुगार सदृश व्यवहार यापासून लांब राहणे फायदेशीर ठरेल. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. विशेषतः पोटाच्या विकारांना काबूत ठेवण्यासाठी पथ्य पाळणे आवश्यक ठरेल. प्रवास ठरतील. जागरूक राहा.

अधिकारांच्या मर्यादा ओळखा

कुंभ : राहत्या घराच्या नूतनीकरणासाठी अथवा घरातील भौतिक सुख- सुविधांच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी आपण मनसोक्त खर्च करण्याच्या विचारात असाल. वाहन खरेदीचे योग, स्थावरबाबतचे प्रश्न सोडवाल. कौटुंबिक परिस्थिती आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील सर्व व्यक्तींचे अपेक्षित सहकार्य लाभेल. नोकरीमध्ये मानसन्मानाचे योग आहेत मात्र इतरांवर आपली कामे सोपवू नका. बोलताना व वागताना इतरांचे गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्या. सरकारी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकारांच्या मर्यादा ओळखून आपले कार्य पूर्ण करावे तसेच लहान-मोठी प्रलोभने टाळून होणारी बदनामी टाळावी.

यश मिळेल

मीन : या आठवड्यातील ग्रहमान आशावादी स्वरूपाचे असल्यामुळे आपल्याला आपल्या कार्यात यश मिळेल. खेळाडू, कलाकार, विद्यार्थी याला आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी मिळू शकतात मात्र त्या संधीचे सोने करणे आपल्या हातात आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नोकरदारांना नोकरीत दिलासा मिळेल. जे जातक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन नोकरी मिळून रोजगाराचा प्रश्न मिटेल. धार्मिक स्थळांना भेट देण्याचा मानस राहील. देवदर्शन होईल. जमीन-जुमला, स्थावर संपत्ती याविषयीचे दीर्घकाळ रखडलेले व्यवहार पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. आप्तेष्ट मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील.

Recent Posts

पंतप्रधान मोदी २२-२३ एप्रिलला सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…

6 minutes ago

बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…

37 minutes ago

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

1 hour ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

2 hours ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

3 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

5 hours ago