मुंबई : मुंबईत पुन्हा हिट अॅण्ड रनची (Hit And Run) घटना घडल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका २५ वर्षीय मॉडेलचा मृत्यू झाला आहे. बाईक आणि डंपरची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला असून अपघातानंतर डंपर चालक फरार झाला आहे. मुंबई पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. (Mumbai Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे गुरुवारी भीषण अपघात झाला. शिवानी सिंह नावाची २५ वर्षीय मॉडेल तिच्या मित्रासोबत बाईकने प्रवास करत होती. रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी वांद्रे पश्चिम येथील कलंत्री चौकात आली. यावेळी एका असता एका डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत शिवानीचा तोल गेल्याने ती गंभीर जखमी झाली. यानंतर जखमी अवस्थेत स्थानिकांनी शिवानी आणि तिचा मित्र दोघांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी शिवानी सिंहला मृत घोषित केले.
दरम्यान या घटनेनंतर टँकरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. टँकर जप्त करण्यात आला आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, लवकरच आरोपी टँकरचालकाला अटक केले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मृत शिवानी सिंह ही २५ वर्षीय तरुणी मॉडेल असून ती मालाड पश्चिम येथे वास्तव्यास आहे, ती चित्रपटसृष्टीत काम करते. शिवानी सिंहला नुकतेच इंडस्ट्रीमध्ये काम मिळण्यास सुरुवात झाली होती. मात्र अशातच तिच्यावर काळाने घाला घातला. शिवानीच्या अपघाती मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबियांना आणि मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे. (Mumbai Accident)
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…