असा हा माझा मित्र : कविता आणि काव्यकोडी

माझा मित्र साहील
आहे फारच भारी
करूच शकत नाही
कुणी त्याची बरोबरी

उंच झाडावर चढण्यात
तो आहे सराईत
नदीत पोहून जाण्यात
तर एकदम पटाईत

एका दमात गावचा
डोंगर जातो चढून
अडचणींतून काढतो मार्ग
नाही बसत दडून

मित्रांच्या गप्पांत तर
त्याची पाहावी कमाल
किस्से सांगतो रंगवून
उडवून देतो धमाल

अभ्यासाच्या वेळी अभ्यास
खेळाच्या वेळी खेळ
अभ्यास आणि खेळाचा
छान साधतो मेळ

इतिहास, भूगोल त्याचा
साराच तोंडपाठ
अवघड गणिताचीसुद्धा
तो सोडत नाही पाठ

संकटात सापडले कुणी,
मदतीला जातो धावून
अभिमान वाटतो मला
त्याच्याकडे पाहून

स्वभावाने तो प्रेमळ
वागण्यात फारच नेक
असा हा माझा मित्र
लाखांमधील एक ...!

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) अतीथंड हवामान
अल्पायुषी वनस्पती
कॅरिबू, रेनडिअर
दिसतात सभोवती

स्लेज गाडीचा वापर
राही इग्लूंच्या घरात
एस्किमो लोक सांगा
दिसे कोणत्या प्रदेशात?

२) नाचू कीर्तनाचे रंगी
ज्ञानदीप लावू जगी
समाजात समतेची
भावना केली जागी

सद्विचारांची पताका
पंजाबपर्यंत नेली
कुणाची पदे शिखांच्या
गुरूग्रंथसाहिबात सामावली?

३) भगवद्गीतेवर मराठीत
भावार्थदीपिका ग्रंथ रचिला
सामान्यांना आचरता येईल
असा आचारधर्म सांगितला

अवघ्या विश्वासाठी त्यांनी
मागितले पसायदान
वारकरी सांप्रदायातील
हे संत कोण महान?

उत्तर -

१) टुंड्रा प्रदेश
२) संत नामदेव
३) संत ज्ञानेश्वर
Comments
Add Comment

खरे धाडस

कथा : रमेश तांबे पावसाळ्याचे दिवस होते. भरपूर पाऊस पडत होता. ओढे-नाले-नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सारे जंगल

बोलल्याप्रमाणे वागावे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर “माणसाला त्याच्या बोलण्यावरून नव्हे तर कृतीवरून ओळखले जाते” असे आपण

मनाचा मोठेपणा

कथा : रमेश तांबे शाळेत भाषण स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्याधरने नेहमीप्रमाणे आपले नाव स्पर्धेसाठी दिले होते.

सहकार्य

कथा : प्रा. देवबा पाटील आदित्यने आधीपासूनच सुभाषला काहीतरी मदत करण्याचा आपल्या मनाशी ठाम निश्चय केलेला होताच.

प्रार्थना

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, अध्यात्मिक, कला-क्रीडा अशा संस्थांमध्ये

फुलासंगे मातीस वास लागे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर माणसाच्या आयुष्यात संगतीचे महत्त्व फार मोठे असते. एखाद्या व्यक्तीचा