पिंपरी: मोठे उद्योग व्यवसाय, लाखो रुपयांचे नोकरीचे पॅकेज यामुळे शहरातील नागरिकांच्या जीवनमानात देखील कमालीचा बदल झाल्याची स्थिती आहे. बदलत्या जीवनशैलीबरोबरच इंम्पोर्टेड महागडी वाहने वापरण्याची ‘क्रेझ’ देखील शहरवासियांमध्ये दिसत आहे. गेल्या वर्षभरात पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाकडे तब्बल ३०३ इंम्पोर्टेड वाहनांची नोंद झाली आहे. त्यामध्ये दुचाकींपेक्षा चारचाकींचा अधिक समावेश आहे.
पवारांचा खोटारडेपणा म्हणजे संविधानाचा अपमान – चंद्रशेखर बावनकुळे
विदेशात तयार होणाऱ्या दुचाकी अथवा चारचाकी वाहनांना देशात आयात केले जाते, अशा वाहनांना इंम्पोर्टेड वाहने म्हणतात. दसरा, दिवाळीसारख्या शुभमुहूर्तावर घरोघरी नवनव्या वस्तुंची खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे अनेकांच्या घरी नवीन वाहने दिसून येतात. दिवाळीच्या सुरूवातीपासून वसुबारस ते भाऊबीजेपर्यंत शहरात सात हजार ३४० वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. त्यामध्ये दुचाकी ते विविध अवजड प्रवासी व व्यावसायिक वाहनांची नोंद झाली आहे.
याद्वारे ४२ कोटींपेक्षा अधिक महसुल आरटीओ विभागाच्या खात्यात जमा झाला आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक शहर असल्याने अनेकांचे मोठमोठे व्यवसाय, उद्योगधंदे, तसेच मोठमोठ्या पगारांच्या नोकऱ्यांचे पॅकेज असल्याने शहरात करोडपतींची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे, आवडीनुसार अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या वाहनांची खरेदी करून आपली हौस पूर्ण करतात.