लोकल प्रवासासाठी बाहेर पडताय? रेल्वेच्या या मार्गांवर आज मेगाब्लॉक

Share

मुंबई: मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार ८ डिसेंबरला आपल्या उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक घेत आहे.

माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे धिम्या मार्गावर वळवल्या जातील आणि माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील आणि त्यांच्या गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाणे पुढील जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ठाणे येथून सकाळी ११.२५ ते दुपारी ३.२७ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील व गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

अप आणि डाऊन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या आणि

गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल – कुर्ला – पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम लाईन स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी मेगा ब्लॉक आवश्यक आहे. प्रवाशांनी होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Recent Posts

Devmanus Film : ‘देवमाणूस’ चित्रपटातील ’सोबती’ गाणे प्रदर्शित

मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…

10 minutes ago

घरातच घडली धक्कादायक घटना, पत्नीने केली माजी पोलीस महासंचालकांची हत्या

बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…

11 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

1 hour ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

1 hour ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

2 hours ago