Eknath Shinde : ईव्हीएमचं रडगाणं सोडून विकासाचं गाणं गा!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना प्रत्युत्तर


मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) निकालात महायुती (Mahayuti) सरकारला घवघवीत यश प्राप्त झालं असून मुख्यमंत्री शपथविधी सोहळा देखील पार पडला आहे. सध्या महाराष्ट्रातील आमदारांचा शपथविधी सुरु आहे. मात्र निकाल जाहीर झाल्यापासून अजूनही विरोधकांचे ईव्हीएम मशीनवरुन (EVM Machine) आरोप-प्रत्यारोप करणं सुरुच आहे. या आरोपांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.



निवडणुकीत जेव्हा महाविकास आघाडीच्या (MVA) बाजूने निकाल लागतो तेव्हा ईव्हीएम मशीन चांगल्या असतात. पण जेव्हा निकाल विरोधात लागतो तेव्हा मविआच्या नेत्यांकडून ईव्हीएम घोटाळ्याची ओरड सुरु होते. विरोधी पक्षाकडे आता मुद्दा राहिलेला नाही. जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे. महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. त्यामुळे आता त्यांनी 'ईव्हीएमचे रडगाणे न गाता विकासाचे गाणे गायला पाहिजे', असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.


त्याचबरोबर नाना पटोले २०० मतांनी जिंकले, रोहित पवार ११०० मतांनी जिंकले, मग काय म्हणायचं? कोणी काही करु शकतं का? संविधान आहे, लोकशाही आहे. जनमताचे स्वागत केले पाहिजे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी

मागील ११ वर्षांत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ११० हून अधिक मराठी शाळांना टाळे मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईकरांच्या आरोग्याला महापालिका निवडणुकांचा फटका !

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी दरम्यान, शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई