Tuesday, January 14, 2025
Homeताज्या घडामोडीPune News : पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन; पोलीस अलर्ट मोडवर!

Pune News : पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन; पोलीस अलर्ट मोडवर!

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवरील (Pune Station) प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर बॉम्ब ठेवला असल्याचा फोन पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला करण्यात आला (Pune Station Bomb Threat) होता. सकाळी ९ वाजता अज्ञात व्यक्तीकडून फोन आल्याची माहिती समोर आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीचे वय ४० असून तो पिंपरी – चिंचवड भागातील रावेत येथील राहणारा असून त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Pune News)

Pushpa 2 : परदेशातही पुष्पा २’चा धुमाकूळ! तीन दिवसांत कमावले ८ दशलक्ष डॉलर्स

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला सकाळी ९ वाजता अज्ञात व्यक्तीने फोन केला. पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर बॉम्ब ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तातडीने प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर तपासणी केली. मात्र त्याठिकाणी तसे काही आढळून आले नाही.

फोन करणाऱ्या व्यक्तीची माहिती काढल्यावर तो पिंपरी – चिंचवड भागातील रावेत येथील राहणारा असल्याचे समजले. त्याला तातडीने पिंपरी चिंचवड पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने नशा करून खोडसाळपणे फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी – चिंचवड पोलिसांकडून सदरील व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -