४१८ अनधिकृत जलजोडण्या खंडित, १०२ बुस्टर जप्त
मुंबई : पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आल्यानंतर १७ जूनपासून कमर्शियल वापराच्या पाण्यावरही २० टक्के कपात लागू करण्यात आली. परंतु ही कपात लागू करतानाच सर्व बांधकामांसाठी दिलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच अनधिकृत जलजोडण्यांविरोधातही धडक मोहिम हाती घेण्यात आली. त्यामुळे १७ जूनपासून आतापर्यंत मुंबईतील बांधकामांच्या ठिकाणच्या १०७ जलजोडण्यात खंडित करण्यात आल्या आहेत.
सुरक्षित व परवडणाऱ्या घरांसाठी सरकार कटिबद्ध; पुनर्विकास प्रकल्पांना वेग मुंबई : मुंबई आणि उपनगरांतील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि परवडणारी ...
महाराष्ट्र शासन(Maharshtra Goverment) जल संपदा विभागाच्या निर्देशानुसार, पाण्याच्या इतर वापरावरही बुधवार, १७ जून २०२६ पासून आवश्यक मर्यादा घालण्यात आल्या आहेत. सर्व बांधकामांसाठी दिलेल्या जलजोडण्या तात्पुरते खंडित करणे, नवीन बांधकाम जल जोडणी मंजूर करण्यात येणार नाही. सर्व जलतरण तलावांना देण्यात आलेल्या जलजोडण्या तात्पुरते खंडीत करणे वाढीव जलजोडणी / अतिरिक्त जलजोडणी करीता अर्ज प्राप्त झाल्यास पुरेसा पाणीसाठी तयार होईपर्यंत मागणी प्रलंबित ठेवणे, औद्योगिक व व्यापारी तसेच स्पोर्टस् क्लब आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. एरीअेटेड वॉटर व पॅकेज वॉटर बॉटलिंग प्लॅंटला दिलेल्या जलजोडण्यातून होणारा पाणीपुरवठा तेथील कामगारांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेइतका कमी करण्यात येत असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानुसार केलेल्या कारवाईमध्ये १०८ बांधकामांच्या ठिकाणी दिलेल्या जलजोडण्यांपैंकी १०७ जलजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. तर कुर्ला येथे १०० मि,मी व्यासाच्या बोगद्याचे काम सुरु असल्याने तेथील जलजोडणी कायम ठेवण्यात आल्याचे जलअभियंता विभागाने नमुद केले आहे. यात शहरातील ८२ बांधकामांचा समावेश आहे.
आरक्षण उपवर्गीकरणावर चर्चेतून तोडगा काढणार; संघर्ष समितीला शिंदेंचे आश्वासन मुंबई : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थी जखमी ...
मुंबईतील ४१८ अनधिकृत जलजोडण्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर १०२ बुस्टर पंपांवर कारवाई करून जप्त करण्यात आले. यामध्ये शहर भागांतील १६९ अनधिकृत जलजोडण्या आणि ३ बुस्टर पंपांचा समावेश आहे. तर पश्चिम उपनगरांतील १३८ अनधिकृत जलजोडण्या आणि ९५बुस्टर पंपांचा समावेश आहे तर पूर्व उपनगरांतील ९३ अनधिकृत जलजोडण्यात आणि ४ बुस्टर पंपांचा समावेश आहे असे जलअभियंता विभागाच्या कारवाईच्या अहवालावरून स्पष्ट केले.
बांधकामाच्या ठिकाणी दिलेल्या जोडण्या : १०८ बांधकामांच्या ठिकाणच्या कापण्यात आलेल्या जोडण्या : १०७ शहर : ८२ पश्चिम उपनगर : १५ पूर्व उपनगर : १०
मुंबईतील कापण्यात आलेले अनधिकृत जोडण्या : ४१८ शहर : १८९ पश्चिम उपनगर : १३६ पूर्व उपनगर : ९३




