Mumbai Pollution : दिल्लीनंतर मुंबईत धोक्याची घंटा! प्रदुषणाच्या पातळीत वाढ

मुंबई : राज्यभरात वाढते औद्योगिकीकरण, कारखाने, शहरीकरण, बांधकाम धूळ, वाहनांचे उत्सर्जन आणि कचरा प्रक्रिया केंद्रे यामुळे प्रदुषणाचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे प्रदुषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यानंतर आता स्मार्ट सिटी म्हणून ओळख असणाऱ्या मुंबईलाही प्रदुषणामुळे धोक्याची घंटा दिली आहे. (Mumbai Pollution)



मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दिल्ली प्रदुषणाचा AQI सध्या 350 आहे. हाच आकडा मुंबई कुर्ला भागातही झाला आहे. या वाढत्या प्रदुषणामुळे अनेकांच्या श्वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत.


मुंबईतील काही उपनगरांमध्ये हवेतील सूक्ष्मकण PM2.5 ची पातळी 150 µg/m³ पेक्षा अधिक आहे. काल ही पातळी 100 µg/m³ होती, प्रदुषणाची ही पातळी राष्ट्रीय सुरक्षित मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधीच काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Mumbai Pollution)



प्रदुषणापासून कसे दूर ठेवाल? 



  • प्रदुषणापासून दूर ठेवायचे असेल घराबाहेर जाताना मास्कचा वापर करा.

  • प्रदूषणामुळे डोळ्यांना होणारं नुकसान टाळण्यासाठी घराबाहेर पडताना चष्मा घाला. हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे टाळा. तसेच डोळे निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि भाज्या खा.

  • प्रदुषणामुळे श्वसनाचा त्रास होत असल्यास घरामध्ये काही झाडे ठेवू शकता ज्यामुळे घराची हवा स्वच्छ होईल.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या