८ डिसेंबरपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष फेस्टिवल गाडी

  140

रत्नागिरी: अहमदाबाद ते थिवी या मार्गावर कोकण रेल्वे मार्गे धावणारी विशेष फेस्टिवल गाडी येत्या ८ डिसेंबरपासून २ जानेवारी २०२५ या कालावधीत चालविण्यात येणार आहे.

ख्रिसमसमुळे कोकण रेल्वे मार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष गाडीचे नियोजन करण्यात आले आहे. आठवड्यातून दोनदा ही गाडी धावणार आहे. अहमदाबाद येथून ही गाडी (क्र. 09412) रविवार तसेच बुधवारी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि गोव्यात थिवी स्थानकावर ती दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पोहोचेल.


परतीच्या प्रवासात ही गाडी (क्र. 09411) थिवी येथून सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि अहमदाबादला दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी कोकणात पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथे थांबेल. गाडीला एकूण १५ एलएचबी डबे असतील.

Comments
Add Comment

पहिलीच्या वेळापत्रकातून ‘हिंदी’ हद्दपार

मुंबई: पहिल्या इयत्तेपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्यासाठी झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारने

चोपदाराच्या उद्धटपणामुळे वारीतील स्नेहभाव, प्रेमबंध, सेवाभावाला गालबोट

वारकरी महिलेला जोरात ढकलून दिल्याचा व्हिडीओ व्हायरल सोलापूर : राज्यात सर्वत्र पंढरीच्या वारीचा उत्साह पाहायला

एकाच महिन्यात ९ लाख लाडक्या बहिणींचा प्रवास

विरार (प्रतिनिधी) : महापालिकेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेत महिलांना

शाडूच्या मूर्तीना भक्तांकडून पसंती

चिपळूण (वार्ताहर): मुंबई उच्च न्यायालयानेही पीओपी गणेशमूर्ती तयार करण्यावर सुरुवातीला बंदी आणली होती. चिपळूण

प्रत्येकाला विश्वासात घेऊनच शक्तिपीठ महामार्ग होणार - नितेश राणे

महामार्गाचा सध्याचा प्लॅन १०० टक्के बदलणार पालकमंत्री म्हणून प्रत्येकाशी संवाद साधण्यास मी तयार सिंधुदुर्ग :

कुरियरवाला असल्याचे सांगत तरुणीवर बलात्कार प्रकरणी, पोलिसांना तात्काळ कारवाईचे निर्देश

सोसायट्यांसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसह नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन  पुणे: कोंढवा