Mayawati : बांगलादेशातील हिंदू अत्याचारावर मौन बाळगणा-या सपा आणि काँग्रेसवर मायावतींचा हल्लाबोल

  59

लखनऊ : बांगलादेशातील हिंदूंवर (Bangladesh Hindu) होत असलेला अत्याचार आणि संभलमधील हिंसाचार प्रकरणी (Sambhal Masjid Controversy) मौन बाळगणा-या सपा आणि काँग्रेसवर बहुजन समाज पक्षाच्या (BSP) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी जोरदार हल्लाबोल केला.


मायावती यांनी शनिवारी बोलताना आरोप केला की काँग्रेस बांगलादेशविषयक मुद्यावर मौन बाळगून मुस्लिम मतांच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे.



मायावती म्हणाल्या, "सपा आणि काँग्रेस दोन्ही पक्ष संभलमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेस, सपा आणि त्यांचे समर्थक या मुद्द्यावर एकाच माळेचे मणी आहेत. अशा परिस्थितीत भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पुढे जाऊन आपली जबाबदारी पार पाडावी, ज्यामुळे शोषित दलित वर्गाला आणखी त्रास सहन करावा लागणार नाही."


मायावती यांनी केंद्र सरकारने बांगलादेश सरकारशी संवाद साधून तिथून भारतीयांना भारतात परत आणण्याची मागणी केली. त्या पुढे म्हणाल्या, "संसदेतील विरोधी पक्ष राष्ट्रीय आणि जनहिताचे मुद्दे उचलण्याऐवजी, संभलमधील हिंसाचाराचा मुद्दा उचलून मुस्लिम मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत, विशेषतः सपा आणि काँग्रेस पक्ष. त्यांना इतर कोणत्याही मुद्द्यांशी काहीही संबंध नाही."


त्यांनी आरोप केला की, संभलमध्ये या पक्षांनी मुस्लिम समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. "मुस्लिम समाजाला सजग राहायला लागेल. हेच नाही, तर दलित वर्गाच्या खासदारांना संसदेत आणणारे लोक, त्यांच्या पक्षाच्या नेत्याला खुश करण्यासाठी दलित अत्याचारावर मौन राखत आहेत. ही एक शोकांतिका आहे," अशी टीका मायावती (Mayawati) यांनी केली.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये