Ajit Pawar: आयकर विभागाचा मोठा निर्णय; अजित पवारांची जप्त केलेली मालमत्ता मुक्त

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आयकर विभागाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली लवादाकडून जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विविध मालमत्तेवर आयकर विभागाने छापेमारी केली होती.



मात्र शुक्रवारी दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने याबाबतच निर्णय दिला होता. पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्ताही कोर्टाने मोकळी केली आहे. स्पार्कलिंग सॉइल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. या सर्व मालमत्ता मुक्त करण्यात आल्या आहेत.


आयकर विभागाने अजित पवारांची जप्त केलेली संपत्ती मुक्त केली आहे. दिल्लीतील ट्रिब्यूनल कोर्टाकडून याबाबतचे आदेश शुक्रवारी जारी केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुनित्रा पवार यांची सपत्ती आयकर विभागाने जप्त केली होती. आता न्यायालयाच्या आदेशानुसार, ही संपत्ती मुक्त करण्यात येणार आहे. लवकरच अजित पवार यांच्या कुटुंबाकडे ही संपत्ती सुपूर्द करण्यात येईल.


Comments
Add Comment

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत

'वन्यजीव संरक्षण अधिनियमात सुधारणा करा'

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांत बिबट्यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातला आहे.

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे