Kalidas Kolambkar : कालिदास कोळंबकर यांनी घेतली हंगामी अध्यक्षपदी शपथ!

मुंबई : विधानसभेच्या निकालानंतर (Assembly Election 2024) काल राज्याचे मुख्यमंत्रीसह उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपा पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांची नियुक्ती करण्यात आली असून आज त्यांचा शपथविधीही पार पडला.



आज राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आमदार कालिदास कोळंबकर यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यामुळे आता विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन काळात यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेचे कामकाज होणार आहे.



काय म्हणाले कालिदास कोळंबकर?


मी कालिदास कोळंबकर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी शपथ घेतो की... असे म्हणत कालिदास कोळंबकर यांनी राजभवनात विधानमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून आज शपथ घेतली. राज्यपाल राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुष्पगुच्छ देऊ त्यांचे अभिनंदन केले. तर, विधानपरिषद सभापती निलम गोऱ्हे यांनीही कोळंबकर यांचे अभिनंदन केले.



विधिमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन


उद्यापासून विधिमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यामध्ये नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. ९ डिसेंबर रोजी नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. तर १६ डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Comments
Add Comment

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी