Pushpa 2: 'पुष्पा २' ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, पहिल्याच दिवशी तोडला 'जवान', 'पठाण'चा रेकॉर्ड

  48

मुंबई: अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित सिनेमा ऑफ दी इयर 'पुष्पा 2: द रूल' (Pushpa 2 The Rule) अखेर चित्रपटगृहात रिलीज झालेला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर धडाधड कमाई करत आहे. 'पुष्पा 2: द रूल' बाबत प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. रिलीज होताच या सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक सिनेमांना मात दिली आहे.


'पुष्पा 2: द रूल'ने ओपनिंग डेच्या कलेक्शनमध्ये बॉलिवूडचे अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांचे रेकॉर्ड तोडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन स्टार सिनेमाने बॉक्स ऑफिसवर संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत साधारण ९७.६५ कोटी रूपयांची कमाई केली आहे.


या कलेक्शनसह सिनेमाने पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई करणारे सिनेमे जवान, पठाण आणि अॅनिमल तसेच देवाराचा रेकॉर्ड तोडला आहे.


शाहरूख खानचा गेल्या वर्षी रिलीज झालेला सिनेमा जवानने पहिल्याच दिवशी ७५ कोटींचे कलेक्शन केले होते. तर पठाणने ५७ कोटी आणि रणबीर कपूरच्या अॅनिमलने ६३.८ कोटी रूपयांची ओपनिंग केली होती.


'पुष्पा 2: द रूल'पहिल्याच दिवशी १०० कोटींच्या जवळपास कमाई करण्याची शक्यता आहे. इतकंच की हा सिनेमा ओपनिंगमध्ये कल्की २८९८ आणि सालारलाही मागे टाकू शकतो. सुकुमार यांच्या दिग्दर्शनात बनलेला 'पुष्पा 2: द रूल' हा सिनेमा २०२१मध्ये झालेल्या पुष्पा सिनेमाचा सिक्वेल आहे. सिनेमात अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना पुन्हा रोमान्स करताना दिसत आहे.

Comments
Add Comment

Shefali Jariwala Passes Away: 'कांटा लगा' फेम शेफाली जरीवालाचे हृदयविकाराने निधन

Shefali Jariwala Passes Away due to Cardiac Arrest: 'कांटा लगा' या गाण्याने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आणि नृत्यांगना शेफाली जरीवालाचे निधन झाले

विजय देवरकोंडावर होणार पोलीस कारवाई ?

  दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा नेहमीच त्याच्या अनोख्या अंदाजामुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेच्या

रश्मिकाच्या या लूकने प्रेक्षक घाबरले; श्रीवल्लीचा उग्र अवतार पाहिला का ?

अभिनेत्री रश्मिका मंदाना कायमच निरनिराळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येऊन त्यांची मन जिंकते. नॅशनल क्रश असणारी

सावरकरांचं ‘संगीत संन्यस्त खड्ग’ पुन्हा रंगमंचावर

मुंबई :'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने नव्या स्वरूपात रंगमंचावर येणार आहे.या

दादरमध्ये सुरांच्या रूपात अवतरणार पंढरपूर

मुंबई : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वारीच्या निमित्ताने भक्तिपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. देवाला आळविण्याचा

'त्या गे व्यक्तीने मला नको तिथे स्पर्श केला...', अभिषेक कुमारचा धक्कादायक अनुभव

मुंबई: 'बिग बॉस १७' मुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिषेक कुमारने (Abhishek Kumar) नुकताच कास्टिंग काऊचचा एक धक्कादायक