नवी दिल्ली : प्रवासासाठी सर्वाधिक आरामदायक, ट्रॅफिकच्या समस्येवर मात करणारी तसेच सुपरफास्ट धावणारी दिल्ली मेट्रो (Delhi Metro) सेवेचा वेग मंदावला असल्याची बातमी समोर आली आहे. दिल्ली मेट्रो लाईनवरील केबल चोरण्यात (Cable Theft) आल्या आहेत. त्यामुळे सध्या दिल्ली मेट्रो सेवा संथ गतीने धावत असून काही ठिकाणी वाहतूकही ठप्प झाली आहे.
Pushpa 2 : अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड; चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू!
मिळालेल्या माहितीनुसार, मोती नगर ते कीर्ती नगर दरम्यानच्या ब्लू लाईनवरील केबल चोरी झाली आहे. याचा फटका मेट्रोसेवेला बसल्यामुळे सर्व गाडवा धीम्या गतीने धावत आहेत. त्याचबरोबर दिल्ली-नोएडा दरम्यान कीर्ति नगर व मोती नगर मेट्रो स्टेशन दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (DMRC) करण्यात आले आहे.
त्याचबरोबर ब्लू लाईनवरील केबल चोरीचा प्रश्न रात्रीच्या कामकाजाचा कालावधी संपल्यानतरच सुटणार आहे, असेही सांगण्यात आले आहे.
Delhi metro: Delay in Blue line services between Moti Nagar and Kirti Nagar due to cable theft
Read @ANI story | https://t.co/B87waoYyg9#Delhimetro #DMRC #BlueLine pic.twitter.com/b8BZgiZhUt
— ANI Digital (@ani_digital) December 5, 2024