Prajakta Chavan : प्राजक्ता चव्हाणची महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर दणक्यात एन्ट्री

Share

मुंबई : सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यामध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. “महाराष्ट्राची हास्यजत्रा” हा कार्यक्रम नवे पर्व, नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होते आहेच. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवं सीजन म्हटलं कि काहीतरी नवनवीन गोष्टी आपल्याला या सीजन मध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहेत. त्यातील एक सरप्राईस पहिल्याच भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पैलवान प्राजक्ता चव्हाण आपल्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये प्रहसन सादर करताना दिसणार आहे. तिच्यात मुळातच असलेला रांगडेपणा प्रेक्षकांना “तुज माज सपान ” मालिकेतून भावला होता. तोच अभिनय आता महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हास्यविरांसोबत रंगलेले तिचे धमाल असे प्रहसन प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. तिचा कोल्हापुरी ठसका आणि कोल्हापुरी भासेहच ठसका आता हास्यजत्रेचा मंचावर पाहायला मिळेल.

या प्रहसनामध्ये प्राजक्ता सोबत तिच्यासारखाच रांगडा गडी रोहित माने देखील असणार आहे. वनिता खरात, चेतना भट, नम्रता संभेराव देखील या प्रहसनात प्राजक्ता सोबत आपल्याला पाहायला मिळतील. आता प्रशासनात काय होणार हि धमाल आपल्याला तेव्हाच समजेल पण एवढं नक्की आहे कि हे धमाल प्रहसन असणार आहे कारण या प्रहसना दरम्यान प्राजक्ता ने चक्क रोहित ला आपल्या खांद्यावर उचलून घेतला आहे. आपल्या रांगडेपणाचा आणि ताकदीची झलक प्राजक्ता ने या प्रहसणादरम्यान प्रेक्षकांना दाखविली आहे.

Recent Posts

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

18 minutes ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

55 minutes ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

4 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

4 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

4 hours ago