६ डिसेंबरला मुंबईत ‘ड्राय डे’ जाहीर

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ६ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई शहर जिल्ह्यातील ठोक व किरकोळ देशी, विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या एफ विभागाचे निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व अबकारी अनुज्ञप्त्या ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते दि. ६ डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस बंद राहणार आहेत, असे आदेश मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहे. आदेशाची अंमलबजावणी न केल्यास अनुज्ञप्तीधारकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या आदेशानुसार, राज्य उत्पादन शुल्कचे डी विभाग निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील एन.एम जोशी मार्ग व वरळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी सर्व अबकारी अनुज्ञप्त्या, ई विभाग निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील भोईवाडा व माटुंगा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व अबकारी अनुज्ञप्त्या ६ डिसेंबर २०२४ रोजी संपूर्ण दिवसभर बंद राहतील.


7399संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाची नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करण्यात कुचराई करतील त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ५४ व ५६ नुसार कडक कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांच्या आदेशात नमूद आहे.

Comments
Add Comment

Bhandup Bus Accident : भांडुप बस दुर्घटना; बस अपघातातील मृतांची नावं समोर, अवघ्या २५ वर्षांच्या तरुणीसह चौघांचा करुण अंत!

मुंबई : भांडुप पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री १० च्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

Snehal Jadhav : मुंबईत 'मनसे'ला मोठा धक्का; स्नेहल जाधव आणि सुधीर जाधव यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश!

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्र नवनिर्माण

पश्चिम रेल्वेचे प्रवासी-केंद्रित विकासाचे ऐतिहासिक वर्ष

२०२५ मुंबई : २०२५ हे वर्ष पश्चिम रेल्वेसाठी एक ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी वर्ष म्हणून उदयास आले. हे वर्ष

राष्ट्रपतींचा 'आयएनएस वाघशीर'मधून प्रवास

मुंबई : भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर आणि भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी अरबी

पश्चिम रेल्वेवर आजपासून विविध मार्गांवर रेल्वे ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेने कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाच्या बांधकामासाठी १८ जानेवारी २०२६

आरे ते कफ परेड मेट्रो रात्रभर धावणार

बुधवारी मेट्रोच्या विशेष फेऱ्यांचे नियोजन मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी