Local Trains : महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी १२ अतिरिक्त लोकलची सुविधा

मुंबई : मध्य रेल्वे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी  ५ आणि ६ च्या मध्यरात्री (गुरूवार-शुक्रवार मध्यरात्री) परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान १२ अतिरिक्त उपनगरीय विशेष गाड्या(Local Trains) चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.

मेन लाइन- अप विशेष:- कल्याण- परळ विभाग :

कुर्ला-परळ विशेष कुर्ला येथून ००.४५ वाजता सुटेल आणि परळ येथे ०१.०५ वाजता पोहोचेल.

कल्याण-परळ विशेष कल्याण येथून ०१.०० वाजता सुटेल आणि परळ येथे २.१५ वाजता पोहोचेल.

ठाणे-परळ विशेष ठाणे येथून ०२.१० वाजता सुटेल आणि परळ येथे २.५५ वाजता पोहोचेल.

मेन लाइन - डाऊन विशेष:- परळ- कल्याण विभाग :

परळ-ठाणे विशेष परळ येथून ०१.१५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे १.५५ वाजता पोहोचेल.

परळ-कल्याण विशेष परळ येथून ०२.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ३.४० वाजता पोहोचेल.

परळ-कुर्ला विशेष परळ येथून ०३.०५ वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ३.२० वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन – अप विशेष:- पनवेल - कुर्ला विभाग :

वाशी-कुर्ला विशेष वाशी येथून ०१.३० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०२.१० वाजता पोहोचेल.

पनवेल-कुर्ला विशेष पनवेल येथून ०१.४० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०२.४५ वाजता पोहोचेल.

वाशी-कुर्ला विशेष वाशी येथून ०३.१० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०३.४० वाजता पोहोचेल.

हार्बर लाईन - डाऊन विशेष – कुर्ला - पनवेल विभाग :

कुर्ला-वाशी विशेष कुर्ला येथून ०२.३० वाजता सुटेल आणि वाशी येथे ०३.०० वाजता पोहोचेल.

कुर्ला-पनवेल विशेष कुर्ला येथून ०३.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०४.०० वाजता पोहोचेल.

कुर्ला-वाशी विशेष कुर्ला येथून ०४.०० वाजता सुटेल आणि वाशी येथे ०४.३५ वाजता पोहोचेल.

कृपया सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व सुविधेचा लाभ घ्यावा. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Comments
Add Comment

नीट-जेईईत फसवणुकीला आळा बसणार

२०२६ पासून ‘चेहरेपट्टीची ओळख’ बंधनकारक नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश

मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यात त्रुटी आढळल्यास सहाय्यक आयुक्तांवर कारवाई

उच्च न्यायालयाचा इशारा मुंबई : मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील वायू प्रदूषण रोखण्यातील कारवाईमध्ये त्रुटी

आमदार झालेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांचे उत्तराधिकारी कोण?

बाळा नर यांच्या प्रभाग ७७मध्ये सर्वाधिक स्पर्धा मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक ही महायुतीसाठी प्रतिष्ठेची,

भावी नगरसेवकांचे शहरासह प्रभागाच्या विकासाचे व्हिजन काय?

निवडणूक आयोग अर्जाद्वारे घेणार लिहून सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आता

नववर्षात १६५ अतिरिक्त उपनगरीय लोकल सुरू होणार

नव्या प्रकल्पांमुळे लोकल सेवांना वेग; प्रवाशांना दिलासा मुंबई : पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांसाठी येत्या काळात

सेव्हन हिल्स हॉस्पिटलसाठी रिलायन्सने लावली ४५० कोटी रुपयांची बोली

मुंबई : सेव्हन हिल्स हेल्थकेअरच्या मुंबईतील प्रसिद्ध हॉस्पिटल खरेदीसाठी रिलायन्स समूहाशी संबंधित एनके