Health: व्हिटामिन D च्या कमतरतेमुळे शरीरावर दिसतात ही लक्षणे

मुंबई: हल्ली अनेकांच्या शरीरात व्हिटामिन डीची कमतरता आढळते. दोनपैकी एका व्यक्तीला व्हिटामिन डीचा कमतरता सतावत असते. खासकरून थंडीच्या दिवसांत व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे शरीराचा त्रास वाढतो. यामुळे व्हिटामिन डीने परिपूर्ण खाद्य पदार्थांचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे.


शरीरासाठी सर्व व्हिटामिन्स, मिनरल्स आणि दुसरी पोषकतत्वे गरजेची आहेत. असेच गरजेचे पोषकतत्व आहे ते म्हणजे व्हिटामिन डी. व्हिटामिन डीची कमतरता असल्यास शरीरात कॅल्शियम आणि आर्यनही कमी होऊ लागते. यामुळे शरीरावर परिणाम होतो. इम्युनिटी कमकुवत होते. थंडीच्या दिवसांत व्हिटामिन डीची कमतरता असल्यास आजारांपासून लढण्याची क्षमताही कमी होते.



या पदार्थांमध्ये असते व्हिटामिन डी


संत्रे - थंडीच्या दिवसांत अनेक जण संत्री खाण्यापासून बचाव करतात. संत्र्‍यामध्ये व्हिटामिन डी, व्हिटामिन सी आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. तुम्ही संत्रे खाऊ शकता अथवा संत्र्‍याचा ज्यूस पिऊ शकता. यामुळे शरीरातील व्हिटामिन डी आणि कॅल्शियमची कमतरता भरून निघते.


सीफूड- व्हिटामिन डीची कमतरता दूर करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये सीफूडचा समावेश केला पाहिजे. माशांमध्ये तुम्ही सॅलमन, ट्युना, मॅकरेल हे मासे खाऊ शकता. यात व्हिटामिन डी आणि हेल्दी फॅट असते.


दूध - दूध आणि डेअरी उत्पादनांमध्ये व्हिटामिन डी मोठ्या प्रमाणात मिळते. खासकरून गाईच्या दुधातून शरीराला व्हिटामिन डी मिळते. दुधामध्ये व्हिटामिन डी शिवाय कॅल्शियम आणि दुसरी पोषकतत्वे मिळतात.


मशरूम - व्हिटामिन डीचा कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही डाएटमध्ये मशरूमचा वापर करू शकता. मशरूमला व्हिटामिन डीचा चांगला स्त्रोत मानले जाते.

Comments
Add Comment

International Yoga Day 2026 : 'Yoga for Healthy Ageing' या संकल्पनेतून निरोगी आयुष्याचा मंत्र

२१ जून हा दिवस संपूर्ण जगासाठी आरोग्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जवळ येत असताना,

Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून

शहरी जीवनातील वाढता मानसिक तणाव: ८२ टक्के नागरिक विळख्यात; अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात प्रगतीची शर्यत जिंकण्याच्या नादात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे

JAMUN : हवामान बदलाचा 'गोड' साक्षीदार: उन्हाळ्याचा निरोप घेताना जांभळाचा मनसोक्त आनंद घ्या!

कडक उन्हाचा तडाखा आता ओसरू लागला असून, पावसाळ्याच्या पहिल्या सरींची चाहूल लागली आहे. ऋतू बदलाच्या या काळात

EAT GOOD : तुम्ही तुमच्या अन्नामुळेच आजारी पडत आहात का? जाणून घ्या सुरक्षित आहाराचे महत्त्व!

अन्न हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून ते आपल्या आरोग्याचा मुख्य आधार आहे. निरोगी जीवनासाठी सुरक्षित, पौष्टिक आणि

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे