Weekly Horoscope : साप्ताहिक भविष्य, १ ते ७ डिसेंबर २०२४

Share

साप्ताहिक राशिभविष्य, १ ते ७ डिसेंबर २०२४

लहान-मोठे प्रवास

मेष : जे जातक नोकरीच्या शोधार्थ आहेत अशा जातकांचा नोकरीविषयक शोध संपून नवीन नोकरी मिळेल, बेरोजगारांना रोजगार मिळेल. चालू नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखतीतून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. कामानिमित्त लहान-मोठे प्रवास होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी अजिबात वेळ न दवडता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक राहील. व्यवसायात परिस्थिती ठीकठाक राहील. काही वेळेस कामाचा ताण जाणवू शकतो. शांतपणे निर्णय घेण्याची गरज. कुटुंबात शुभवार्ता मिळाल्यामुळे आनंदी राहाल. अचानक झालेल्या धनलाभामुळे आश्चर्यचकित राहाल. व्यवसायात नवीन बदल फायद्याचे ठरतील.

धनलाभाची शक्यता

वृषभ : समाजातील मान्यवर तसेच प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखी होऊन भेटीगाठी होतील. प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली महत्त्वाची कार्ये पूर्ण होण्यासाठी या भेटीगाठी उपयोगी पडतील. मध्यस्थी यशस्वी होतील. जमीन व स्थायी संपत्ती संबंधित असलेली रखडलेली कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. वडिलोपार्जित संपत्तीविषयी असलेले वाद-विवाद संपुष्टात येतील. सर्वमान्य तोडगा निघेल. भावंडांशी सख्य राहील. लहान-मोठे गैरसमज दूर होतील. जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील. चांगल्या धनलाभाची शक्यता. व्यवसायातील स्थिती समाधानकारक राहील. नोकरीतील परिस्थिती अनुकूल राहील. जुनी येणी वसूल होतील

प्रगतिकारक घटना

मिथुन : अनुकूल ग्रहमान लाभल्यामुळे अनेक मार्गाने धन आगमन होऊ शकते. नेहमीच्या उत्पन्नाच्या मार्गाच्या शिवाय उत्पन्न वाढू शकते. खर्चाचे प्रमाण वाढेल. अनावश्यक खर्चाला कात्री द्या. अनेक चांगल्या घटना घडून येतील. कुटुंबाच्या सुखसोयीसाठी खर्च करावेत. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळचा तसाच दूरचा प्रवास करावा लागेल. नोकरीमध्ये आपली परिस्थिती चांगली राहील. प्रगतिकारक घटना घडेल. काहींना पदोन्नती मिळेल, तर काहींची बदली देखील होऊ शकते. कामाच्या स्वरूपात बदल घडून कामाचा व्याप वाढेल. मुलांच्या प्रगतीच्या वार्ता कानावर येतील. अचानक धनलाभ देखील होऊ शकतो.

नवीन करार-मदार होण्याची शक्यता

कर्क : अनुकूल ग्रहमानाची साथ मिळाल्यामुळे घरामध्ये अनुकूल वातावरण निर्माण होईल. घरातील सदस्य एकमेकांच्या विषयी आपुलकी वाढवतील. जमिनीची तसेच मालमत्तेची कामे होतील मात्र थोडे सबुरीचे धोरण स्वीकारावे लागेल. घाईगर्दीत कोणताही निर्णय घेणे हितकारक ठरणार नाही. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. प्रवासाचे योग आहेत. सहकुटुंब सहपरिवार प्रवास घडू शकतो. नोकरीमध्ये बदल होऊ शकतात. मात्र ते बदल सकारात्मक होतील. व्यवसायात भरभराट होऊ शकते. नवीन करार-मदार होण्याची शक्यता. मनोरंजनाकडे कल असेल. सप्ताह मजेत जाईल.

आर्थिक प्रगती

सिंह : या आठवड्यात आपली चांगलीच आर्थिक प्रगती होणार आहे. व्यवसायामधील जुनी येणी वसूल झाल्यामुळे व्यावसायिक प्रगती होईल. अनेकानेक मार्गाने धंनागमन होऊ शकते. व्यवसायात नवीन बदल केल्यामुळे व्यवसायावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. जमीन-जुमला यांच्या व्यवहारांमध्ये लाभ होईल. नातेवाईक, आप्तेष्ट व जुने मित्र यांच्या गाठीभेटी होऊ शकतात. सामाजिक तसेच धार्मिक कार्यात भाग घ्याल. कुटुंबातील सर्व सदस्यांचे अपेक्षित सहकार्य लाभल्यामुळे अनेक कामे मार्गी लावू शकाल.

भागीदाराची मदत मिळेल

कन्या : आतापर्यंत आलेला मनावरचा ताण कमी होण्यास सुरुवात होईल. जोडीदाराची साथ लाभेल. धनलाभाचे योग आहेत. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराची मदत मिळेल. आपल्या जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. मात्र आपल्या बोलण्यावर व वर्तनावर नियंत्रण आवश्यक. कोणाचाही अपमान करणे टाळा. कुटुंबात एखादे धार्मिक कार्य घडेल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे गतीमान होतील. मतभेद मिटतील. नोकरीत अनुकूल स्थिती निर्माण होईल मात्र आपण राजकारण व गटबाजीपासून दूर राहा. मित्रमंडळींच्या वर्तुळात वादविवाद टाळा.

मतभेद संपुष्टात येतील

तूळ : प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कामे गतीमान होतील. सरकारी कामात लागणारा विलंब नाहीसा होईल. त्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटेल. एखादे महत्त्वाचे काम होऊ शकते. व्यावसायिकांनी सरकारी कायदे व नियम कसोशीने पाळायला हवेत. आर्थिकदृष्ट्या बरोबर होईल. काहींना दूरचे तसेच जवळचे प्रवास करावे लागतील. प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक. अति आत्मविश्वास नको. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. जीवनसाथीबरोबर असलेले मतभेद संपुष्टात येतील. घरातील वातावरण आनंद देईल. प्रेमिकांना अनुकूल कालावधी.

मानाचे पद मिळेल

वृश्चिक : अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करू शकाल. यशाचे प्रमाण वाढते राहील. नोकरीत आपल्याला नवीन अधिकार मिळेल. पदोन्नती आणि वेतन वृद्धीचे योग आहेत. सामाजिक मानसन्मानामध्ये वाढ होऊन प्रतिष्ठेत भर पडेल. एखाद्या समारंभात मानाचे पद मिळेल. आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम राहील. प्रेमामध्ये अनुकूल प्रतिसाद मिळू शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक यात्रा घडून देव दर्शन होईल. त्यामुळे समाधान लाभेल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या राहतील. त्यासाठी खर्चही करावा लागेल.

महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकते?

धनु : प्रदीर्घ काळ मनात असलेली एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकते. अडलेल्या या सप्ताहात आपल्याला भाग्याची साथ मिळू शकते. प्रदीर्घ काळ मनात असलेली एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकते. अडलेली कामे होतील. पर्यटन किंवा कामानिमित्त दूरचे तसेच जवळचे प्रवास घडू शकतात. प्रवास कार्य सिद्ध होतील. नोकरीत मानसन्मान मिळू शकतो. पदोन्नती तसेच वेतन वृद्धी होईल. मात्र नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. त्याचप्रमाणे बदलीची तयारी ठेवा. आर्थिकदृष्ट्या उन्नती होईल

नियोजन उपयोगी पडेल

मकर : आपल्यासमोरील दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे होतील, विशेषतः सरकारी स्वरूपाची कामे. मात्र आजचे काम आजच करा. कामामध्ये विलंब नको. नोकरीत अपेक्षित सहकार्य मिळेल. वरिष्ठांबरोबर असलेले संबंध सुधारतील. तसेच सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. जमीन-जुमला व स्थानी संपत्तीविषयीचे व्यवहार गतीमान होतील. मध्यस्ती फलद्रूप होतील. वडिलोपार्जित संपत्तीविषयी असलेले मतभेद संपुष्टात येतील. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल. आपल्या मतास प्राधान्य मिळेल. गुरुजनांचे आशीर्वाद लाभतील. मात्र अभ्यासामध्ये दुर्लक्ष करू नका. वेळेचे नियोजन उपयोगी पडेल.

अपेक्षित सहकार्य लाभेल

कुंभ : कुटुंबातून तसेच आपल्या कार्यक्षेत्रातून आपल्याला अपेक्षित सहकार्य लाभेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. यामुळे महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल. व्यावसायिक बद्दल फायदेशीर ठरतील. नवीन तंत्रज्ञान व नव्या संकल्पनांचा वापर करू शकाल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता मात्र आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. प्रवासाचे योग. सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळींच्या समवेत लहान-मोठ्या प्रवासाचे योग आहेत. प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक. राजकारणी जातकांना विरोध झेलावा लागेल. विरोधक आक्रमक बनू शकतात. प्रवास घडतील. प्रवासात आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे.

फायद्याच्या प्रमाणात वाढ होईल

मीन : संमिश्र ग्रहमानामुळे आपल्याला संमिश्र फळे मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला कामांमध्ये अडथळे जाणवू शकतात. त्याचप्रमाणे धावपळ आणि दगदग होईल. स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबातील व्यक्तींकडून सहकार्य करावे मात्र स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण आवश्यक. व्यावसायिक परिस्थिती समाधानकारक राहून आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यावसायिक उलाढाल वाढून फायद्याच्या प्रमाणात वाढ होईल. जमीन-जुमला यांची कामे गतिमान होऊ शकतात. सरकारी नोकरीत प्रलोभने टाळणे हिताचे ठरेल. मात्र भागीदारी व्यवसायात भागीदाराची मतभेद होऊ शकतात ते टाळा.

Recent Posts

UPSC CSE Result : ‘यूपीएससी’चा निकाल जाहीर! महाराष्ट्राचा अर्चित डोंगरेने मारली बाजी

नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…

5 minutes ago

लँड स्कॅमचा बादशाह उद्धव! आशिष शेलारांचा थेट घणाघात

मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…

7 minutes ago

Heart Attack: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ का झाली आहे? अभ्यासात मोठा खुलासा

कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…

42 minutes ago

Pune News : पुण्यात रोड रेजचा धक्कादायक प्रकार; हॉर्न वाजवला म्हणून जोडप्याला मारहाण

पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…

59 minutes ago

Devmanus 3 : ‘या माप घेतो म्हणत’ देवमाणूस परत आला! पहा थरारक प्रोमो

मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…

1 hour ago

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

3 hours ago