Pune News : कात्रज चौकातील उड्डाणपुलामुळे पुणेकरांची कोंडी; वाहतुकीत बदल!

पुणे : पुण्यातील (Pune News) रखडत असणारे कात्रज चौकातील (Katraj Chowk) उड्डाणपुलाचे काम वाहतूक शाखेकडून पुन्हा सुरु करण्यात आले आहे. यापूर्वीही कात्रज चौकामधील उड्डाण पुलाचे मुख्य चौकातील सेगमेंटल लॉचिंगचे काम हाती घेतले होते. मात्र पुणेकरांच्या होणाऱ्या कोंडीमुळे सातत्याने पुढे ढकलले जात होते. मात्र आता आता वाहतूकीचे नियोजन वाहतूक शाखेने केले असून ३ डिसेंबरपासून हे काम सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतूकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.



कोणते मार्ग बंद?



  • कात्रज चौकात जड/अवजड वाहनांना बंदी असणार आहे. साताऱ्याकडून जुना कात्रज बोगद्यामार्गे येणाऱ्या वाहनांना शिंदेवाडी पुलापासून आणि नविन बोगद्यामार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवलेपुल येथे आणि मुंबईकडून वारजेमार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवलेपूल येथे प्रवेश बंद राहणार आहे.

  • सोलापुरकडून हडपसरमंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाच्या पुढे, सासवडकडून मंतरवाडीमार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाच्या पुढे, बोपदेव घाटाकडून कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना खडीमशिन चौकापुढे, मार्केटयार्ड, गंगाधाम बिबवेवाडीमार्गे कात्रज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना इस्कॉन मंदिर चौकाच्या पुढे प्रवेश बंद राहील.

  • सातारा रस्त्यावरून स्वारगेटकडून कात्रजमार्गे साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेश बंद राहील. त्याचबरोबर, मंतरवाडी, उंड्री, पिसोळी भागातील स्थानिक जड वाहनांना रात्री १० वाजल्यापासून सकाळी ४ वाजेपर्यंत प्रवेश चालू ठेवण्यात येणार आहे. मात्र, त्यांना इस्कॉन मंदिर चौकाच्या पुढे कात्रज चौकाकडे प्रवेश बंद राहील. (Pune News)

Comments
Add Comment

अभिजात मराठी भाषा परिषद देशाच्या दृष्टीने महत्त्वाची - उदय सामंत

अमरावती : प्रत्येक भाषेने आपली अस्मिता उभी केली आहे. त्यामुळे ही अस्मिता अखंडपणे पुढे न्यायची असल्यास देशातील

नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयावर महसूल मंत्र्यांची धाड: लाचखोरी उघड, रोकड जप्त

नागपूर : नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात चालणाऱ्या भ्रष्ट कारभारावर लगाम घालण्यासाठी राज्याचे महसूल

कार्तिकी एकादशीला कोण करणार पंढरपूरला विठ्ठलाची पूजा, शिंदे की पवार?

सोलापूर : दरवर्षी परंपरेनुसार आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री पूजा करतात. राज्याला उपमुख्यमंत्री असले तर

'लाडक्या बहिणी' भडकल्या! कारण काय?

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. लाडकी बहीण

पापलेट उत्पादनात घट का झाली?

मत्स्य शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तलावांचे नियमन - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मत्स्य

पुणेकरांनी लावली महामेट्रोची वाट! गुटखा-पानाच्या तुंबा-यांनी रंगल्या भिंती, जीने आणि गाड्या...

पुणे मेट्रोत हजारो लाइटर, किलोंनी तंबाखू, गुटखा जप्त पुणे : सुसंस्कृत आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या