मुंबई: वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील डिसेंबरच्या पहिल्या तारखेला महागाईचा मोठा झटका बसला आहे. तसेच तेल वितरण कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत(LPG Price) वाढ केली आहे. विविध शहरांतील कंपन्यांनी किंमती जाहीर केल्या आहेत. यानुसार १९ किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात १८ रूपयांपर्यंत वाढ झाली आहे. याआदी नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेलाही सिलेंडरचे दर वाढले होते. दरम्यान, १४ किलोंच्या सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
एलपीजी सिलेंडच्या दरात १ डिसेंबरपासून बदल करण्यात आलेले आहेत. दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत या दरात बदल झाले आहेत. १ डिसेंबरला देशाची राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरटे दर १८१८.५० रूपये झाले आहेत. आधी हे दर १८०२ रूपये होते.
शहरे वाढलेले दर आधीचे दर
दिल्ली १८१८.५० रूपये १८०२ रूपये
कोलकाता १९२७ रूपये १९११.५० रूपये
मुंबई १७७१ रूपये १७५४.५० रूपये
चेन्नई १९८०.५० रूपये १९६४.५० रूपये
बऱ्याच कालावधीपासून १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. मात्र १४ किलोंच्या घरगुती सिलेंडरच्या दरात मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…