मुंबई : देशभरात सातत्याने महागाईचा भडका उडताना दिसून येत आहे. सोन-चांदी, भाजीपाला, खाद्य तेल, फळे, पेट्रोल-डिझेल अशा दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. अशातच आता ही महागाई बाथरूमकडेही वळली आहे. साबण बनवणाऱ्या कंपन्यांनी साबणाच्या किमतीत (Soap Price Hike) वाढ केली आहे. त्यामुळे आता अंघोळ करणेही महाग होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.
Railway Megablock : प्रवाशांचा खोळंबा! मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक, अनेक गाड्या रद्द
मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनेशिया आणि मलेशियामधून आयात केले जाणाऱ्या शुल्कात वाढ ३५-४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या पामतेलाचा भाव सुमारे १,३७० रुपये प्रति १० किलो आहे. त्यामुळे देशातील दैनंदिन ग्राहकोपयोगी वस्तू (FMCG) कंपन्यांनी अंघोळीच्या साबणाच्या किमतीत ८ टक्क्यांनी वाढ केली आहे.
कोणत्या साबणाचे वाढले दर?
डव्ह, लक्स, लाईफबॉय, Liril, Pierce, Rexona या ब्रँड्सच्या किमती वाढवल्या आहेत. दरम्यान, FMCG क्षेत्रात सहसा एक कंपनी आधी किमती वाढवते, त्यानंतर हळूहळू इतर कंपन्याही किमती वाढवतात. त्याच धर्तीवर एचयूएल आणि विप्रोनंतर इतर कंपन्याही साबणाच्या किमती लवकरच वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Soap Price Hike)