वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन
मुंबई : रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) दर रविवारी रेल्वे मार्गावर अभियांत्रिक कामाच्या दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येतो. त्याचप्रमाणे उद्या देखील मध्य (Central Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तर काही लोकल उशिराने धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून प्रवाशांनी वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Mini Mahabaleshwar Dapoli : मिनी महाबळेश्वर दापोलीत हुडहुडी; पारा आठ अंशांवर
मध्य रेल्वे ब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशीदरम्यान सकाळी १० वाजून ५५ मिनिट ते दुपारी ३ वाजून २५ मिनिटाच्या सुमारास मध्य रेल्वेने ब्लॉक जारी केला आहे.
परिणाम : ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळण्यात येणार आहे. कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वे मार्गावर उद्या पनवेल ते वाशी दरम्यान (नेरूळ/बेलापूर – उरण बंदर मार्ग वगळून) सकाळी ११ वाजून ५ मिनिट ते सायंकाळी ४ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास ब्लॉक घेण्यात येणार आहे.
परिणाम : सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर आणि ठाणे ते पनवेल या मार्गादरम्यान अप आणि डाउन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत . सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावणार आहे. ठाणे ते वाशी / नेरूळ आणि बेलापूर / नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान फेऱ्या वेळापत्रकानुसार धावतील.
पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर (Western Railway) शनिवारी मध्यरात्रीनंतर १२ वाजून १५ मिनिट ते रविवारी पहाटे ४ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास ब्लॉक घेणार आहे.
परिणाम : ब्लॉकवेळेत डाउन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड आणि माहीम स्थानकात फलाटाच्या अनुपलब्धतेमुळे लोकल थांबणार नाहीत.