मुंबई : गेल्या महिन्याभरापासून राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे (ST Corporation) कर्मचारी दिवाळी भेटीची वाट पाहत होते. अखेर गुरुवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळी भेट जमा झाल्याने त्यांना दिलासा मिळाला. एसटी कर्मचाऱ्यांना यंदा विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) आचारसंहितेमुळे (Code Of Conduct) दिवाळी भेट (Diwali Gift) मिळाली नाही.
बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी झाल्यानंतरही बोनस मिळाला नव्हता. आचारसंहिता असल्यामुळे निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन दिवाळी भेट वितरित केली जाईल, असे स्पष्ट करीत बेस्ट उपक्रमाने निवडणूक आयोगाला विनंती पत्र पाठविले होते. त्याच धर्तीवर एसटी महामंडळाने निवडणूक आयोगाला विनंती पत्र पाठवले. एसटी महामंडळातील ९० हजार कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट देण्यात आली आहे.
भाजपाचे युवा नेते व आमदार नितेश राणे (Mla Nitesh Rane) यांनी बेस्टमधील कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. बेस्ट कर्मचाऱ्यांची भूमिका प्रशासनदरबारी आमदार नितेश राणे यांनी पटवून दिली होती. नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाला बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर करावा लागला, मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांनाही २९ हजार रुपये बोनस देण्यात आला असून त्यांच्या या बोनसमधून पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे आयकर कापण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्याविषयी समाधान व्यक्त
केले आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…