Saturday, February 15, 2025
Homeमहाराष्ट्रNitesh Rane : एसटी, बेस्ट कर्मचाऱ्यांचे दिवाळीनंतर चांगभलं!

Nitesh Rane : एसटी, बेस्ट कर्मचाऱ्यांचे दिवाळीनंतर चांगभलं!

दिवाळी उलटल्यावर बोनससह मिळाली दिवाळीभेट

मुंबई : गेल्या महिन्याभरापासून राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे (ST Corporation) कर्मचारी दिवाळी भेटीची वाट पाहत होते. अखेर गुरुवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळी भेट जमा झाल्याने त्यांना दिलासा मिळाला. एसटी कर्मचाऱ्यांना यंदा विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) आचारसंहितेमुळे (Code Of Conduct) दिवाळी भेट (Diwali Gift) मिळाली नाही.

Fangal Cyclone: फेंगल चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता

बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी झाल्यानंतरही बोनस मिळाला नव्हता. आचारसंहिता असल्यामुळे निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन दिवाळी भेट वितरित केली जाईल, असे स्पष्ट करीत बेस्ट उपक्रमाने निवडणूक आयोगाला विनंती पत्र पाठविले होते. त्याच धर्तीवर एसटी महामंडळाने निवडणूक आयोगाला विनंती पत्र पाठवले. एसटी महामंडळातील ९० हजार कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट देण्यात आली आहे.

आमदार नितेश राणेंचे मानले आभार

भाजपाचे युवा नेते व आमदार नितेश राणे (Mla Nitesh Rane) यांनी बेस्टमधील कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. बेस्ट कर्मचाऱ्यांची भूमिका प्रशासनदरबारी आमदार नितेश राणे यांनी पटवून दिली होती. नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाला बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर करावा लागला, मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांनाही २९ हजार रुपये बोनस देण्यात आला असून त्यांच्या या बोनसमधून पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे आयकर कापण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांनी केलेल्या पाठपुराव्याविषयी समाधान व्यक्त
केले आहे.

अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना मिळाली दिवाळी भेट

  • यंदा दिवाळीचा बोनस न मिळाल्यामुळे बेस्ट उपक्रमातील चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र आता दिवाळीनंतर एक महिन्याने २७ हजार बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळी भेट जमा झाली आहे. त्यामुळे बेस्टचे कर्मचारी सुखावले आहेत.
  • दिवाळीनंतरही बोनस मिळत नसल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. या मागणी बेस्ट कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ आंदोलनही केले. कर्मचाऱ्यांचा रोष लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने बेस्टच्या खात्यात ८० कोटी रुपये जमा केले. तसेच येत्या काही दिवसांत बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा होईल असे जाहीर करण्यात आले होते.
  • मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बेस्ट कर्मचाऱ्यांची बोनस रक्कम मिळू शकली नाही. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन, पुढील काही दिवसांत बोनस देण्यात येईल, असे बेस्ट उपक्रमाकडून स्पष्ट करण्यात आले होते.
  • या निर्णयानंतर दोन आठवड्यांनी म्हणजेच गुरुवारी २७ हजार बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात २७ ते २९ हजार रुपये बोनस जमा झाला, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -