Reshma Shinde : शुभमंगल सावधान! रेश्मा शिंदेने केली ‘आयुष्याची नवी सुरुवात’

पुणे : 'लगोरी', ‘नांदा सौख्यभरे’, ‘चाहूल’, ‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या सर्व मालिकांमधून अभिनेत्री रेश्मा शिंदे लोकांच्या घराघरांत लोकप्रिय झाली. अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीच्या लग्नाची खूप दिवसांपासून चर्चा सुरु होती. अभिनेत्रीने तिच्या लग्नाची तयारीसुद्धा चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर केली होती. मात्र अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्याचा नाव आणि चेहरा अद्याप समोर आणला नव्हता. आता अखेर अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. अभिनेत्री आता पवनसह लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली आहे. रेश्माच्या लग्नापुर्वीच्या विधींचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीचा पुण्यात शुभविवाह सोहळा संपन्न झाला आहे. रेश्माच्या लग्नाच्या फोटोंवर चाहते आणि मराठी सेलिब्रिटी शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.



रेश्मा आणि पवनची काल हळदीचा कार्यक्रम पार पडला. आता समोर आलेल्या फोटोंमध्ये रेश्मा आणि पवन यांचा पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रेश्मा आणि पवन यांचा लग्नासाठीचा मराठमोळा लूक खूप खास आहे. अभिनेत्रीने यावेळी गुलाबी रंगाची नऊवारी साडी हिरवा चुडा, चंद्रकोर, नाकात नथ, केसात चंद्रकोरचा खोप आणि मोत्यांचे दागिने परिधान करत सुंदर लुक तयार केला आहे. तर अभिनेत्री रेश्माच्या नवऱ्याने ऑफ व्हाईट शेरवानी, धोतर आणि गुलाबी रंगाचा शेला परिधान करत नवऱ्या मुलाचा लूक तयार केला आहे. या लूकमध्ये दोघेही भारी दिसत आहे. दोघांच्या फोटोवर चाहत्यांसह अनेक मराठी कलाकार देखील तिला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.





रेश्माने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघे सप्तपदी घेताना दिसत आहे. तर कानपिळी विधीचा फोटोही अभिनेत्रीने शेअर केला आहे. बरेच दिवसांपासून रेश्माच्या लग्नाची चर्चा सुरु होती. रेश्माने तिच्या नवऱ्याबाबत काहीचं उघड केले नव्हते. मात्र सर्वानाच उत्सुकता होती की रेश्माचा नवरा आहे तरी कोण? अखेर काल अभिनेत्रीच्या हळदीदिवशी तिच्या नवऱ्याचा फोटो समोर आला. रेश्माने तिच्या हळदीदिवशी शेअर केलेल्या फोटोंमध्ये नवऱ्याची झलक चाहत्यांना दिसली. याचदरम्यान अभिनेत्री आणि तिचा नवरा पवन या दोघांचीही जोडी सुंदर दिसत आहे.





अभिनेत्रींच्या कामाबद्धल बोलायचं झाल्यास रेश्माने मराठी मालिका 'लगोरी', ‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमधून अभिनेत्री प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचली. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील जास्त सक्रिय असल्यामुळे तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने रेश्मा नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. तसेच रेश्माने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण सुद्धा केलं आहे. छोट्या पडद्यावरील ही अभिनेत्री आता उद्योजिका झाली आहे. रेश्माने पुण्यात कोथरुड येथे पालमोनास या ज्वेलरी ब्रँडबरोबर भागीदारी करून स्वत:चे ज्वेलरी शॉप उघडले आहे.


Comments
Add Comment

बिग बॉस १९ स्पर्धकांना दाखवली ट्रॉफीची पहिली झलक, टॉप ५ स्पर्धकांचे डोळे दिपले

मुंबई : बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना घरातील पाच फायनलिस्ट निश्चित झाले आहेत. बिग बॉसने या सीझनच्या

रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या आगामी चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. काही

प्राजक्तानं नंदीवरुन घेतलेली एन्ट्री योग्य की अयोग्य ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

मुंबई : नुकताच स्वराज्यरक्षक संभाजी फेम येसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा विवाह सोहळा झाला.

रीलस्टार जोडपं निघाले सराईत चोर! आयफोन 17 प्रो मॅक्स, साडे सहा तोळे सोन्याचे दागिने आणि लाखो रुपये...

अहिल्यानगर: जिल्हा पोलिस दलाने बसमधून महिलांच्या पर्स चोरी करणाऱ्या एका सराईत जोडप्याला जेरबंद केले आहे. या

‘व्ही. शांताराम’ यांचे जीवन मेगा बायोपिकच्या रूपात

भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे

हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्या-फुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी