Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीनेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे काँग्रेसचा पराभव- खरगे

नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे काँग्रेसचा पराभव- खरगे

नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाला नेत्यांची बेताल वक्तव्य आणि एकतेचा अभाव ही कारणीभूत असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. काँग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये खरगे यांच्या नेतृत्वात पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हेही उपस्थित होते.

खरगे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये आपण चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये देखील एक वेगळा उत्साह होता. मात्र त्यानंतर तीन राज्यांत निवडणुका झाल्या तिथे आपल्याला जी अपेक्षा होती, त्या अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. इंडी आघाडीनं चार पैकी दोन राज्यांमध्ये सरकार स्थापन केलं, मात्र त्यामध्ये काँग्रेसची कामगिरी अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती.

मी पुन्हा पुन्हा हेच सांगतो. आपल्या पराभवाची दोनच कारणं आहेत, त्यापैकी सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे पक्षात असलेला एकजुटीचा अभाव आणि दुसरं कारण म्हणजे काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद, एकमेकांविरोधात देण्यात येणारी स्टेटमेंट यांमुळे पक्षाचं मोठं नुकसान होत आहे, जर हे वेळीच थांबवलं गेलं नाही, तर याचा मोठा फटका हा आपल्या पक्षाला बसू शकतो. ज्या राज्यात आपला पराभव झाला तिथे आपली संघटना म्हणावी तेवढी मजबूत नाही. आपल्याला त्या राज्यात आपलं संघटन मजबूत करण्याची गरज आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांची एक मजबूत मोट आपल्याला बांधावी लागणार आहे. सोबतच त्या-त्या राज्यात असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे देखील आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही, तेथील स्थानिक मुद्दे आपल्या लक्षात घ्यावे लागतील, त्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रूपरेषा तयार करावी लागेल

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -