Monday, February 10, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखराणे पुन्हा एकदा जिंकले...!

राणे पुन्हा एकदा जिंकले…!

माझे कोकण – संतोष वायंगणकर

कुडाळ-मालवण मतदारसंघातील जनतेकडून २०१४ च्या निवडणुकीत विद्यमान खा. नारायण राणे यांचा पराभव केला होता. ती चूक सुधारत जनतेनेही मोठ्या मनाने आ. निलेश राणे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गाठण्याची भाषणही कोकणातील जनतेला अजिबात मानवली नाही. रत्नागिरीतही महायुतीला यश देताना उद्योगमंत्री आ. उदय सामंत यांच्या नेतृत्वावरही जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. खा. नारायण राणे यांच्या नेतृत्व गुणांचा प्रभाव आणि विश्वास रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांवर होता. ते देखील या विधानसभा निवडणुकीत सिद्ध झाले. राणे हरले नाहीत, राणे संपले नाहीत, राणे पुन्हा एकदा जिंकले आहेत.

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील निवडणुकीचे साद, पडसाद

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी झाले आणि निवडणूक निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीच्या पारड्यात महाराष्ट्रातील जनतेने भरभरून यश दिले आहे. दिवाळी पूर्वीपर्यंत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे वारे वाहत होते. त्याला लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जे यश मिळाले त्याची किनार होती. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जे यश मिळाले त्यामुळे साहजिकच उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस, पवारगट, राष्ट्रीय काँग्रेस या महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांना महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतही राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या बाजूने राहील या विश्वासात महाविकास आघाडीचे नेते राहिले. राज्यातील जनतेचा बदललेला कल महाविकास आघाडीतील नेत्यांना समजलाच नाही.

राज्यातील मतांची विभागणी महाविकास आघाडीतील नेत्यांनी करून टाकली. राज्यातील मागासवर्गीय आंबेडकरी दलित समाज, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने राहील असा त्यांचा अंदाज होता. राज्यातील मुस्लीम समाज महाविकास आघाडीच्या सोबतच राहील याची खुणगाठ आघाडीतील नेत्यांनी बांधली होती. यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच संविधान धोक्यात आहे. भाजपा हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करीत आहे. अशाप्रकारे गोबेल्स प्रचार करणारी टिमही महाविकास आघाडीकडून कार्यरत करण्यात आली. काही ज्येष्ठ पत्रकार यांनी तर महाविकास आघाडीचे प्रवक्ते असल्याप्रमाणेच जेवढी जहरी टीका भाजपावर करता येईल तितकी टीका आणि बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न माध्यमातून करण्याचा प्रयत्न चालविला होता. अशा नरेटीव्ह पसरविणाऱ्या वातावरणात महायुतीचा सुफडा साफ होईल अशी वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नाना पटोले यांसारख्या नेत्यांनी चालविला होता. यासाठी मुस्लीम समाजाच्या मौलवींचा फतवा काढल्याचेही जाहीर करण्यात येत होते. उबाठा गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांची वक्तव्य ही देखील टोकावरची होणारी टीका. माझी लाडकी बहीण योजनेवर सतत टीका करणारी सर्वांची वक्तव्य या सर्वांचा परिणाम राज्यातील मतदानातून दिसून आला.

एकीकडे राज्यात महाविकास आघाडीकडून मुस्लीम समाजाचे जे लांगुनचालन करण्यात येत होते. त्यामुळे साहजिकच हिंदू समाज या निवडणुकीनिमित्ताने कुठेही प्रदर्शन न करता एकवटला. राष्ट्रीय स्वयंसेवकांनी शांततेने ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न राज्यभरात केला. मतदानाचा पवित्र हक्क बजावा या टॅग लाईनने संघ स्वयंसेवकांनी काम केले. कोणालाही विरोध न करता हे सर्व महाराष्ट्रात होत होते. यामुळे अशक्य वाटणारी गोष्ट सहजतेने घडून आली. याचवेळी उबाठाच्या उमेदवारांनी मतांसाठी जी बोटचेपी भूमिका घेतली त्याचा एकत्रित परिणाम निवडणूक निकालात झालेला दिसला. मतदारांना गृहीत धरण्याचे दिवस आता उरले नाहीत. समाज माध्यमांच्या अतिवापराने समाजात घडणाऱ्या घटना, राजकीय नेते पुढाऱ्यांकडून केली जाणारी वक्तव्ये लोकांपर्यंत सहजतेने पोहोचत होती. यामुळे महाविकास आघाडी विरोधात आपोआप वातावरण तयार होत गेले. मुस्लीम व वंचित समाजाच्या मतांचा हिशोब मांडून बसणाऱ्या महाविकास आघाडी त्याच गणितांवर यशाची मांडणी करत होते आणि त्यातच महाविकास आघाडीतील अनेकांना मुख्यमंत्री पदाचीही स्वप्न पडत होती; परंतु महाराष्ट्रातील जनतेला जे केंद्रात सत्तेवर आहेत त्यांनाच राज्यात सत्तेवर आणायचे होते.

जनतेला महाराष्ट्रात स्थिर सरकार आणायचे होते. यामुळेच तब्बल ३८ वर्षांनंतर राज्य विधिमंडळात विरोधी पक्षनेताही असणार नाही असा दणदणीत विजय महायुतीला दिला. राज्यातील या यशात कोकणचेही लोकसभा निवडणुकीप्रमाणे मोठे योगदान राहिले आहे. भाजपा नेते आणि मंत्री आ. रवींद्र चव्हाण यांनीही कोकणात महायुतीला चांगले यश मिळावे म्हणून प्रयत्न केले. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीला चांगले यश मिळू शकले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता ही खा. नारायण राणे यांनाच मानणारी आहे हे सिद्ध करताना आ. निलेश राणे व आ. नितेश राणे यांच्यावर विकासाची जबाबदारी दिली आहे. राणेंना हरवण्यासाठी सिंधुदुर्गात उबाठाचे नेते उद्धव ठाकरे, आ. आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, शरद कोळी अशा वाचाळवीरांनी राणे परिवारावर टीका केली; परंतु यावेळीही सिंधुदुर्गातील जनतेने राणेंवरची टीका सहन केली नाही आणि राणेंनीही कोणतीही उलट प्रतिक्रिया न देता जनताच मतपेटीतून उत्तर देईल इतके सूचक उत्तर दिले आणि जनतेनेही खा. नारायण राणे यांच्याप्रमाणेच आ. निलेश राणे आणि आ. नितेश राणे तसेच आ. दीपक केसरकर यांनाही विजयी करत राणे यांच्या पाठीशी सिंधुदुर्ग जिल्हा असल्याचे सिद्ध केले. कुडाळ-मालवण मतदारसंघातील जनतेकडून २०१४ च्या निवडणुकीत विद्यमान खा. नारायण राणे यांचा पराभव केला होता. ती चूक सुधारत जनतेनेही मोठ्या मनाने आ. निलेश राणे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गाठण्याची भाषणही कोकणातील जनतेला अजिबात मानवली नाही. रत्नागिरीतही महायुतीला यश देताना उद्योगमंत्री आ. उदय सामंत यांच्या नेतृत्वावरही जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. खा.नारायण राणे यांच्या नेतृत्व गुणांचा प्रभाव आणि विश्वास रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांवर होता. ते देखील या विधानसभा निवडणुकीत सिद्ध झाले. राणे हरले नाहीत, राणे संपले नाहीत, राणे पुन्हा एकदा जिंकले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -