Pak vs Sri: पाकिस्तानात हिंसक आंदोलने, दौरा अर्धवट सोडून परतला श्रीलंकेचा संघ

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन कोणत्या देशात होणार यावरून सातत्याने वाद सुरू आहे. मात्र त्याआधीच पाकिस्तानची स्थिती खूपच खराब होत चालली आहे. इस्लामाबादमध्ये सुरू असलेल्या राजकीयविरोधी आंदोलनाचा फटका खेळांवर दिसून येत आहे.


पाकिस्तानातील हिंसक आंदोलनामुळे श्रीलंकेच्या संघाने दौरा अर्धवट सोडत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका ए संघाची वनडे मालिका पाकिस्तानात खेळवली जात होती. मात्र ही मालिका मध्येच सोडून श्रीलंकेचा संघ मायदेशी परतला आहे. याबाबत श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बातचीत केल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली.


या चर्चेनंतर या मालिकेतील दोन एकदिवसीय सामने रद्द करण्यात आले आहेत. हे दोन्ही सामने रावळपिंडीमध्ये खेळले जाणार होते. यानंतर आता ही मालिका पूर्ण करण्यासाठी भविष्यात कार्यवाही करण्यात येईल असे पाकिस्तान बोर्डाने सांगितले.


पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक ए इन्साफने रविवारपासून मुख्य इस्लामाबादच्या दिशेने विरोध प्रदर्शन सुरू केले आहे. या दरम्यान अनेक हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.

Comments
Add Comment

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना

रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर मालिकेत अपयशी

भारतीय संघाच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिका पराभवामागचे ‘व्हिलन‘ मुंबई : भारतीय संघाला घरच्या मैदानावर

बांगलादेशला निर्णय घेण्यास उद्यापर्यंत वेळ

अन्यथा आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलँड संघाला मिळणार संधी मुंबई : अवघ्या दोन आठवड्यांवर आलेल्या टी-२०

भारत-पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारीला क्रिकेटचे दोन सामने

आयसीसी टी-२० मध्ये महामुकाबला होणार मुंबई : क्रिकेट चाहत्यांना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान या २ देशांच्या

'न्यूझीलंड'ने इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल!

कोहलीची झुंजार खेळी व्यर्थ; भारताचा ४१ धावांनी पराभव इंदोर (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड संघाने भारताचा तिसऱ्या

किवींच्या 'मिशेल-फिलिप्स'चा झंझावात; निर्णायक वन-डेमध्ये भारतासमोर हे लक्ष्य

इंदूर (वृत्तसंस्था): भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वन-डे मालिकेतील