Purushottam Berde : जीवनगौरव पुरस्काराचा आनंद वेगळाच

Share

विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ वितरणा प्रसंगी पुरुषोत्तम बेर्डे यांचे प्रतिपादन

ठाणे : ‘माझ्या कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवी टप्प्यावर हा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे.’ कार्यरत असताना मिळालेला हा जीवनगौरव अजून चांगले काम करायला बळ देणारा असल्याचे प्रतिपादन लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे (Purushottam Berde) यांनी विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या प्रतिष्ठेच्या ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ वितरण प्रसंगी केले. ‘खंडोबाचं लगीन’ या नाटकादरम्यान लोकशाहीर विठ्ठल उमप यांची ओळख झाली आणि आज त्या नाटकातील काही मंडळीच्या साक्षीने हा पुरस्कार मिळतोय हा वेगळा आनंद सुद्धा आहे. अतिशय दृष्ट लागण्यासारखा हा सोहळा आयोजित केल्याबद्दल नंदेश उमप आणि सरिता उमप यांचे मनापासून कौतुक करत पुरुषोत्तम बेर्डे यांनी या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. नुकताच १४ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ सोहळा ठाणे येथील काशिनाथ घाणेकर सभागृहात रंगला. इतर मृदगंध पुरस्कार विजेत्यांमध्ये सुरेखा पुणेकर (लोककला), श्रीगौरी सुरेश सावंत (सामाजिक क्षेत्र), आदेश बांदेकर (अभिनय व सूत्रसंचालन), सुचित्रा बांदेकर (अभिनेत्री आणि निर्माती), रोहित राऊत (नवोन्मेष प्रतिभा-संगीत क्षेत्र), दीपाली देशपांडे (क्रीडा क्षेत्र) आणि ज्ञानेश महाराव (लेखक व पत्रकार) यांना ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना पुरस्कार विजेत्यांनी महाराष्ट्र शिरोमणी शाहीर विठ्ठल उमप यांच्या आठवणींना उजाळा देत पुरस्काराविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

अभिनेते आदेश बांदेकर म्हणाले की, ‘कलेच्या प्रवासात अनेक आश्वासक हात पाठीवर पडले त्यातला एक हात शाहीर विठ्ठल उमप यांचा होता हा पुरस्कार नाही तर आशीर्वाद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.’

शाहीर विठ्ठल उमप यांनी आदेशला आपल्या मुलाप्रमाणे मदत केली आहे. त्यामुळे सासऱ्यांच्या नावाचा हा पुरस्कार स्वीकारणे माझ्यासाठी भाग्याचे असल्याचे अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी सांगितले.

या पुरस्काराने नवं, चांगलं काम करण्याची प्रेरणा तर मिळाली पण जबाबदारी सुद्धा वाढल्याची कबुली गायक रोहित राऊत यांनी दिली.

मातीचा गंध असणारा हा पुरस्कार माझी महाराष्ट्राशी असणारी वीण आणखी घट्ट करणार असल्याचे प्रतिपादान क्रीडापटू दीपाली देशपांडे यांनी केले.

माझ्या मातीतील हा पुरस्कार असून शाहीर विठ्ठल उमप यांचे आशीर्वाद माझ्यासोबत असल्याचे मत श्रीगौरी सुरेश सावंत यांनी व्यक्त केले.

या पुरस्कारामुळे धन्य झाल्याची भावना लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी बोलून दाखविली.

तर हा पुरस्कार माझा स्वाभिमान वाढवणारा आहे, असे लेखक व पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी सांगितले.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या अभिनेत्री रोहिणी हटट्गंडी म्हणाल्या की, ‘ज्यांनी आपल्या कलेतून रसिकांना आनंद दिला त्यांची आठवण आज त्यांची मुलं ठेवतायेत हे खरंच खूप कौतुकास्पद आहे.’ जयराज साळगावकर (संपादक, कालनिर्णय), संदिप माळवी (अतिरिक्त आयुक्त, ठाणे) आदी मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी दत्ता भाटकर, गणेश धाडसे, अमृत कांबळे, पुंडलिक सानप, अनिल आरोसकार या रंगमंच कामगारांना अर्थसहाय्य देण्यात आले.

यावेळी तौफिक कुरेशी (झेंबे वादक) आणि ग्रुप पं. विजय चव्हाण व ग्रुप (महाराष्ट्राची वाद्य) यांच्या सुमधुर संगीताची मेजवानी तसेच सितारादेवी व नटराज गोपीकृष्ण यांचे वंशज असलेले विशाल कृष्णा यांच्या कथ्थक नृत्याचा आस्वाद रसिकांनी घेतला. या बहारदार कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

Recent Posts

Devmanus 3 : ‘या माप घेतो म्हणत’ देवमाणूस परत आला! पहा थरारक प्रोमो

मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…

3 minutes ago

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

1 hour ago

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

2 hours ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

2 hours ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

3 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…

3 hours ago