President Murmu : भारतीय राज्यघटना तीन वर्षाच्या विचारमंथनाचे फलित : राष्ट्रपती मुर्मू

नवी दिल्ली : भारतीय संविधान लोकशाहीचा मजबूत पाया आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Murmu) यांनी मंगळवारी केले. संविधान दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानाबद्दल आदर व्यक्त करुन संविधानाचे महत्व अधोरेखित केले. संविधान सदनाच्या (जुने संसद भवन) सेंट्रल हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभा सभापती जगदीप धनखड, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे मंचावर उपस्थित होते.



राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, पंच्याहत्तर वर्षांपूर्वी याच दिवशी ‘संविधान सदन’च्या याच सेंट्रल हॉलमध्ये संविधान सभेने राज्यघटना तयार करण्याचे कार्य पार पाडले. स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सर्व नागरिकांनी 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा केला. पुढील वर्षी २६ जानेवारीला आपण आपल्या प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करू. अशा उत्सवांमुळे एकात्मता मजबूत होते.


भारतीय राज्यघटना ही काही महान विचारवंतांनी केलेल्या सुमारे तीन वर्षांच्या विचारमंथनाचे फलित आहे. तसेच खऱ्या अर्थाने ते आपल्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्याचे फलित आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यपालिका, विधिमंडळ आणि न्यायपालिका तसेच सर्व नागरिकांच्या सक्रिय सहभागातून आपल्या घटनात्मक आदर्शांना बळ मिळते, असे राष्ट्रपती म्हणाल्या. राज्यघटना हा जिवंत आणि प्रगतीशील दस्तावेज आहे.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना