Raj Thackeray MNS : राज ठाकरेंचं इंजिन चिन्ह धोक्यात; मनसे पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता!

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निकालात (Assembly Election 2024) महायुती (Mahayuti) सरकार बहुमताने विजयी झाले आहे. परंतु दुसरीकडे राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला (MNS) मोठा फटका बसला आहे. मनसे पक्षाकडून १२८ जागांवर उमेदवार निवडणूक लढवत होते. मात्र एकही आमदार विजयी होऊ न शकल्यामुळे राज ठाकरे यांना मोठा धक्का सहन करावा लागत आहे. अशातच मनसे पक्षाची मान्यता आता रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



मनसेचा पक्ष धोक्यात का?


निवडणूक आयोगाच्या (Election Commision) निकषानुसार, एखाद्या पक्षाला मान्यता टिकवायची असल्यास त्या पक्षाला एकूण ८ टक्के मतदान आणि १ जागा किंवा २ जागा आणि ६ टक्के मतदान किंवा ३ जागा आणि ३ टक्के मतदान यापैकी एक निकष त्या पक्षानं पूर्ण करणं आवश्यक आहे. मात्र मनसेला एकही जागा मिळाली नसून ४८ लाख मते देखील मिळाली नाहीत, त्यामुळे मनसे पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते, असे विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सांगितले.



मान्यता रद्द झाल्यास काय परिणाम होणार?


मान्यता रद्द होणे म्हणजे पक्षाचे चिन्ह धोक्यात येणे. म्हणजेच राज ठाकरेंच इंजिन चिन्ह धोक्यात येऊ शकतं यापुढे त्यांना ते चिन्ह मिळू शकणार नाही. पुढील निवडणूक लढवण्यास राज ठाकरे यांना दुसरे चिन्ह घ्यावे लागेल.

Comments
Add Comment

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ पुरस्कार

मुंबई : महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ या पुरस्कारासाठी निवड

शिवसेनेकडून निवडणूक प्रभारींची घोषणा

सिंधुदुर्गची आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकरांवर जबाबदारी मुंबई  : आगामी नगर परिषद व नगरपंचायत

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

लक्ष्य सेनची जपान मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा सहज पराभव नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुममातो

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली 'सोलर शाळा'

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य आणि ‘रोझी ब्लू