Pinga G Pori Pinga: प्रत्येक महिलेच्या मनाचा आरसा दाखवणारी 'पिंगा गं पोरी पिंगा'

मुंबई: रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असतं मैत्रीचं नातं. याच मैत्रीच्या नात्यावर आधारित आजवर अनेक कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. अशातच आता महाराष्ट्राच्या लाडक्या 'कलर्स मराठी'वर पाच भिन्न स्वभावाच्या मैत्रीणींची भन्नाट गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.'पिंगा ग पोरी पिंगा' या नव्या मालिकेत पाच मैत्रीणींची, त्यांच्या स्वप्नांची अनोखी दुनिया प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ऐश्वर्या शेटे, विदिशा म्हसकर, शाश्वती पिंपळीकर, प्राजक्ता परब आणि आकांक्षा गाडे या अभिनेत्री मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. वैभव चिंचाळकर या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. तेव्हा नक्की बघा प्रत्येक महिलेच्या मनाचा आरसा दाखवणारी नवी गोष्ट 'पिंगा गं पोरी पिंगा', आजपासून संध्याकाळी 7.30 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर.

'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेची गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या महिलांची ज्यांच्या मनात भविष्याची स्वप्न आहेत. स्वत: काहीतरी करुन दाखवायची जिद्द आहे आणि त्यासाठी घरापासून दूर बाहेरच्या जगात स्वत:चं अस्तित्व उभं करण्याची त्यांची धडपड सतत सुरू असते. या धडपडीत जेव्हा आपल्या सारख्याच अनेक सख्या त्यांना सापडतात तेव्हा त्या मैत्रीची रंगत जगावेगळी असते.




पुरुषांच्या मैत्रीवर आधारित अनेक चित्रपट, नाटक, वेब सीरिजची निर्मिती झाली आहे. पण बायकांची मैत्री त्यापेक्षा खूप वेगळी असते आणि हीच मैत्री प्रेक्षकांना 'पिंगा गं पोरी पिंगा'मध्ये अनुभवता येईल. वकील होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आपल्या नवऱ्याच्या मदतीने मुंबईत आलेली जळगावची वल्लरी जेव्हा इथे अनेक वर्ष राहून स्ट्रगल करणाऱ्या मिठू (सातारा), तेजा (पुणे), श्वेता (सोलापूर) आणि प्रेरणा (कोकण) यांच्यासोबत पेइंग गेस्ट म्हणून राहू लागते. तेव्हा या शहरात रंगलेल्या मुलींवर वल्लरीसोबत आलेला गावचा रंग चढू लागतो. सुरुवातीला वल्लरीला घरातून काढण्यासाठी टपलेल्या या मुली हळू हळू तिच्या खास मैत्रिणी कशा बनतात याचा हा रंजक प्रवास आहे.

'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेत प्रेक्षकांना मैत्रीचे अनेक रंग पाहायला मिळतील. पण त्या सोबतच स्त्रियांच्या भावविश्वाचे विविध पैलू अतिशय मनोरंजक पद्धतीने आपल्याला पहायला मिळतील. प्रेम, लग्न, करियर, पालकांसोबत असलेलं त्यांचं नातं, शहरात एकट्या राहणाऱ्या मुलींकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, रोजच्या आयुष्यात त्यांना येणाऱ्या अडचणी आणि या सगळ्या अडचणीवर मात करत एकमेकांच्या मदतीने ठामपणे उभ्या राहणाऱ्या या पाच महिलांची गोष्ट म्हणजेच 'पिंगा गं पोरी पिंगा'. प्रत्येक महिलेच्या मनाचा आरसा दाखवणारी ही मालिका आहे.

कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे मालिकेबद्दल म्हणाले,"प्रेक्षकांची आवड लक्षात घेत नवनवे कार्यक्रम देण्याचा आमचा उद्देश आहे. रिफ्रेशिंग, कलरफुल गोष्ट प्रेक्षकांना 'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेत पाहायला मिळेल. स्वत:चं अस्तित्व शोधणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ही गोष्ट आहे. नेहमीच्या मालिकांपेक्षा ही मालिका नक्कीच वेगळी आहे. पाच मैत्रीणींच्या मैत्रीची रंगत पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल".

Comments
Add Comment

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं