‘या’ दृश्यामुळे चित्रपटावर घेतला आक्षेप
मुंबई : अल्लू अर्जुनाचा (Allu Arjun) पुष्पा २ (Pushpa 2) बहुचर्चित चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. मात्र काही नागरिकांकडून हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच बंद करण्याची मागणी केली जात आहे. चित्रपटात दाखवल्या गेलेल्या काही चित्रिकरणामुळे थेट आक्षेप घातला आहे.
AUS vs IND: षटकारासह यशस्वीचे दमदार शतक, भारताकडे अडीचशे पार आघाडी
हिसार गावातील काही लोकांनी पुष्पा २ चित्रपटाबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये चित्रपटातून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नेमके कारण काय?
हिसार येथील कुलदीप कुमार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना कुलदीप कुमारने सांगितले की, ‘पुष्पा २: द रुल’च्या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुनला अर्धनारीश्वरच्या भूमिकेत दाखवण्यात आला आहे. त्यात माँ कालीचे चित्रही दिसते. त्यांच्या मते या दृश्यामुळे धार्मिक भावनाही दुखावल्या जात आहेत. पैशांसाठी धर्माला दुखावू अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माँ काली आणि अल्लू अर्जुनच्या अर्धनारीश्वरचा सीन चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे. असे न केल्यास हरियाणात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. मात्र अद्यापही पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. (Pushpa 2)