IND vs AUS: ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला कर्णधार रोहित शर्मा? अ‍ॅडलेड कसोटीत खेळणार

मुंबई: भारताचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला आहे. पर्थमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत रोहित खेळत नाही आहे. रोहितची पत्नी रितीका सजदेहने नुकताच एका मुलाला जन्म दिला. रोहित याच कारणामुळे ऑस्ट्रेलियाला गेला नव्हता. मात्र एका रिपोर्टनुसार आता तो रवाना झाला आहे. तसेच अ‍ॅडलेडमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्याचा तो भाग होईल. टीम इंडिया रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात खेळत आहे.


रोहितचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. दरम्यान, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रोहित लवकरच टीम इंडियासोब दिसेल. दरम्यान, भारतीय संघ सध्या पर्थमध्ये आहे. येथे कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे.


रोहितसाठी मागील मालिका काही खास नव्हती. भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. रोहितने न्यूझीलंडविरुद्ध बंगळरू कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकले होते. या खेळीनंतर तो सतत फ्लॉप राहिला. त्याने पुणे कसोटीत ८ धावा केल्या होत्या. यानंतर मुंबई कसोटीत पहिल्या डावात १८ धावा आणि दुसऱ्या डावात ११ धावा केल्या होत्या.आता रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध कमबॅक करू शकतो.


पर्थमध्ये खेळवल्या जात असलेल्या कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात १५० धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात शानदार कमबॅक केले. भारताने एकही विकेट न गमावता १७२ धावा केल्या आहेत. भारतीय संघ सध्या २१८धावांच्या आघाडीवर आहे.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात