Mufasa: The Lion King : मुफासा: द लायन किंगचा हिंदी ट्रेलर रिलीज; शाहरुखचा छोटा मुलगा करणार सिंह गर्जना!

'या' तारखेला होणार प्रदर्शित


मुंबई : बॅरी जेनकिन्स (Barry Jenkins) यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'मुफासा: द लायन किंग' (Mufasa: The Lion King) हा हॉलिवूड (Hollywood) चित्रपट भारतीय प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत आहे. बहुचर्चित असणाऱ्या या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वीच इंग्रजीमधून ट्रेलर रिलीज झाला. त्यानंतर हिंदी भाषेत ट्रेलर कधी येणार असा प्रश्न असताना आता मुफासा: द लायन किंगचा हिंदी ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) छोट्या मुलाचा आवाज घुमताना दिसणार आहे.



हॉलिवूडच्या या लोकप्रीय ॲनिमेटेड चित्रपटात शाहरुखसोबत त्याच्या दोन्ही सिंबांचा आवाज ऐकू येणार आहे. मुफासासाठी बॉलिवूड किंगखान शाहरुखसोबत त्याच्या दोन्ही मुलांनी म्हणजेच अबराम खान (Abram Khan) आणि आर्यन खान (Aryan Khan) यांनीही आवाज दिला आहे. हा चित्रपट २० डिसेंबर २०२४ रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.




या कलाकारांचाही आवाज येणार ऐकू


बॅरी जेनकिन्स यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला या चित्रपटात शाहरुख, आर्यन आणि अबराम यांच्याशिवाय रफीकीच्या आवाजात मकरंद देशपांडे (Makrand Deshpande) पुंबाच्या आवाजात संजय मिश्रा (Sanjay Mishra), टिमॉनच्या आवाजात श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि मियांग चेंग यांनीही आवाज दिला आहे.

Comments
Add Comment

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर

‘रुबाब’चा टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओजच्या ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिलीच झलक आणि ‘तुझ्यासारखी

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीपासून चित्रपटगृहात

नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.