Friday, February 7, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वAdani Group Stock : अदानी समूहाच्या शेअर्समध्ये भूकंप; थेट २० टक्क्यांपर्यंत कोसळले...

Adani Group Stock : अदानी समूहाच्या शेअर्समध्ये भूकंप; थेट २० टक्क्यांपर्यंत कोसळले स्टॉक्स!

नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टमुळे अडचणीतून सावरलेला अदानी समूह (Adani Group) पुन्हा गोत्यात आला आहे. आज शेअर उघडताच सर्व स्टॉक धडाधड कोसळल्याचे (Stock Fall) दिसून आले. गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर लाच आणि फसवणूकीच्या आरोपामुळे (Fraud Case) याचा जोरदार फटका अदानी समूहाच्या शेअर्सला (Adani Group Stock) बसला आहे.

Financial planning : हे ७ सूत्र लक्षात ठेवा! पैसा इतका वाढेल की, लोक विचारायला येतील-तुम्ही हे कसे केले?

समूहातील सर्व १० लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स घसरले. अदानी एनर्जी सोल्यूशन्सचा शेअर २० टक्क्यांनी घसरून ६९७.७० रुपयांवर आला आणि शेअरला लोअर सर्किट लागले आहे. त्यामुळे याचा मोठा झटका गुंतवणूक दारांनाही बसला आहे.

नेमके प्रकरण काय?

अदानी यांच्यावर सौर प्रकल्पांचे कंत्राट आणि वित्तपुरवठा करण्यासाठी मोठी लाच दिल्याचा आरोप असून त्यांनी ही बाब अमेरिकन गुंतवणूकदारांपासून लपवली आहे. त्यामुळे अमेरिका न्यायालयाने गौतम अदानी यांना लाचखोरी आणि फसवणुकीचा आरोपाखाली दोषी ठरवले आहे. या संपूर्ण प्रकरणात अदानी यांचा पुतण्या आणि अदानी ग्रीन एनर्जीचे कार्यकारी संचालक सागर अदानी आणि कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत जैन यांच्यासह अन्य आरोपी आहेत.

कोणत्या शेअरमध्ये किती घसरण?

  • अदानी ग्रीन एनर्जी – १९.१७ टक्के
  • अदानी टोटल गॅस – १८.१४ टक्के
  • अदानी पॉवर – १७.७९ टक्के
  • अदानी पोर्ट्स – १५ टक्के
  • अंबुजा सिमेंट – १४.९९ टक्के
  • एसीसी – १४,५४ टक्के
  • एनडीटीव्ही – १४.३७ टक्के
  • अदानी विल्मर – १० टक्के (Adani Group Stock)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -